Kolhapur: विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव, जिल्हा नियोजन सभेत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:56 IST2026-02-12T11:55:45+5:302026-02-12T11:56:19+5:30

जागा दिल्याच्या ऋणाची आठवण जपणार

International cricket stadium in Vikaswadi Kolhapur named after Ajit Pawar, decision taken in district planning meeting | Kolhapur: विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव, जिल्हा नियोजन सभेत निर्णय 

Kolhapur: विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव, जिल्हा नियोजन सभेत निर्णय 

कोल्हापूर : विकासवाडी (ता. करवीर) येथे साकारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय बुधवारी (दि. ११) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. सर्व आमदारांच्या वतीने याबाबतचा ठराव केला असून, तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, कोल्हापुरातील विकासवाडी येथे ३२ एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिली आहे. या स्टेडियमसाठी आम्ही १५ ते २० एकर जमिनीची मागणी केली होती. त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम साकारणार आहात, भविष्यात आणखी जागेची गरज पडेल, सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतील असे सांगून ३० एकर जागा देऊ तसेच स्टेडियमच्या विकासासाठी निधीदेखील देऊ असे सांगितले होते. 

त्यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने कोल्हापुरात हा प्रकल्प होत आहे. अजितदादांची आठवण म्हणून या स्टेडियमला त्यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव आमदार अमल महाडिक यांनी मांडला. त्याला सर्व आमदारांनी अनुमाेदन देऊन हा ठराव करण्यात आला आहे. आता हा ठराव, निर्णय शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यासाठी सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करतील.

Web Title : कोल्हापुर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम का नाम अजित पवार के नाम पर रखा जाएगा।

Web Summary : कोल्हापुर में अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम का नाम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के नाम पर रखा जाएगा। सभी विधायकों ने प्रस्ताव का समर्थन किया, जिसे सरकार को मंजूरी के लिए भेजा जाएगा। स्टेडियम परियोजना पवार के समर्थन और धन से शुरू की गई थी।

Web Title : Kolhapur International Cricket Stadium to be named after Ajit Pawar.

Web Summary : The international cricket stadium in Kolhapur will be named after the late Deputy Chief Minister Ajit Pawar. All MLAs supported the resolution, which will be sent to the government for approval. The stadium project was initiated with Pawar's support and funding.