Kolhapur: ७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:58 IST2025-05-09T16:58:08+5:302025-05-09T16:58:23+5:30

हातकणंगले पोलिसांची कारवाई

Interest of 24 lakhs recovered in exchange for 7 lakhs, three private moneylenders arrested in Hatkanangale | Kolhapur: ७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

Kolhapur: ७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील तिघा खासगी सावकारांनी मौजे मुडशिंगी येथील औषधी दुकानदाराला व्याजाने दिलेल्या ७ लाखांचे २४ लाख वसूल केले. खासगी सावकाराने परत १७ लाखांची मागणी केल्याने औषधी दुकानदार उत्तम तानाजी पाटील (रा. मुडशिंगी ता. हातकणंगले) यांनी विजय आप्पासो चव्हाण (वय ३९), विष्णू आण्णासो जाधव (४५ ), संतोष बाळू रोहिले (४२, सर्व रा. आळते ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

उत्तम पाटील यांचे मौजे मुडशिंगी येथील गणेश मंदिराजवळ औषधी विक्रीचे दुकान आहे. त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये व्यवसाय आणि वैयक्तिक कारणासाठी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून प्रति माहिना ३ टक्के व्याजदराने ७ लाख रुपये घेतले होते. उत्तम पाटील यांनी वेळाेवेळी व्याज आणि घेतलेली मुद्दल अशी २४ लाख रुपयांची परतफेड केली.

तरीही या खासगी सावकारांनी उत्तम पाटील यांच्याकडे आणखी १७ लाख देण्यासाठी तगादा लावला होता. पाटील यांच्यासह कुुटुंबाला मानसिक त्रास दिला जात होता. खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विजय आप्पासो चव्हाण, विष्णू आण्णासो जाधव, संतोष बाळू रोहिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिशीचे पेव 

तालुक्यातील गावागावांमध्ये लिलाव भिशीचे पेव फुटले आहे. १ लाखाच्या रकमेला लिलाव भिशीमध्ये ३० हजारापर्यंत व्याज आकारणी करून भिशीचालक सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. भिशीच्या नावाखाली व्याजाचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.

Web Title: Interest of 24 lakhs recovered in exchange for 7 lakhs, three private moneylenders arrested in Hatkanangale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.