शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 11:00 IST

Shivaji University kolhapur : विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून (दि. १५) नियमित भरविण्यात यावेत, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी दिली. त्याबाबतचे ई-मेल विद्यापीठ प्रशासनाने अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविले आहेत.

ठळक मुद्देपदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचनावसतिगृहे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करा

कोल्हापूर : विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून (दि. १५) नियमित भरविण्यात यावेत, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी दिली. त्याबाबतचे ई-मेल विद्यापीठ प्रशासनाने अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविले आहेत.महाविद्यालयांमध्ये वर्ग भरविण्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने विद्या परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली. त्यानंतर वर्ग भरविण्याबाबतच्या विविध सूचना या ई-मेलव्दारे केल्या आहेत. त्यामध्ये वसतिगृहे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षा घेणे, वर्गातील उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, वसतिगृहे आणि महाविद्यालयांचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करून घेणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याबाबत प्रशासनासमवेत चर्चा करणे, आदी सूचनांचा समावेश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि विद्यापीठाने नेमलेल्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीच्या शिफारशींची माहिती अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर