सांगली-कोल्हापूर महामार्गावर गतिरोधक बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:02+5:302021-02-09T04:26:02+5:30

जयसिंगपूर : तमदलगे हद्दीमधून सांगली-कोल्हापूर व कोल्हापूर-जयसिंगपूर-सांगली असे दोन महामार्ग गेलेले आहेत. या मार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात ...

Install speed bumps on Sangli-Kolhapur highway | सांगली-कोल्हापूर महामार्गावर गतिरोधक बसवा

सांगली-कोल्हापूर महामार्गावर गतिरोधक बसवा

जयसिंगपूर : तमदलगे हद्दीमधून सांगली-कोल्हापूर व कोल्हापूर-जयसिंगपूर-सांगली असे दोन महामार्ग गेलेले आहेत. या मार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली-कोल्हापूर महार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्यावरील रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या पलीकडे जाणे अत्यंत जोखमीचे व धोकादायक झालेले आहे. याठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या गतीवर ब्रेक लावण्यासाठी याठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. बसवाण खिंड याठिकाणीही कोल्हापूरहून येणारी वाहने प्रचंड वेगाने येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यास धोका निर्माण झाला आहे. याठिकाणीही गतिरोधक बसविण्यात यावे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झालेस रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर राकेश खोंद्रे, प्रकाश सादुले यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Install speed bumps on Sangli-Kolhapur highway