शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहक ‘हुदहूद’च्या अस्तित्वावर घाला

By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST

पूर्व भागातील स्थिती : शेती दुर्मिळ पक्ष्यांच्या जिवावर उठली

प्रवीण जगताप-- लिंगपूर --जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत पाहावयाला मिळणारा ‘हुदहूद’ पक्षी (ज्याला आपण माहितीअभावी सुतार पक्षी म्हणतो) आता अत्यंत दुर्मिळ झाला आहे. मागील चार-पाच वर्षांत त्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे. अणकुचीदार चोच, डोक्यावर तुरा, अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे, तपकिरी रंगांची आकर्षक रंगसंगती यामुळे मनमोहक दिसणारा ‘हुदहूद’ आता शोधूनही पहावयास मिळत नाही. घटत चाललेला गवताळ प्रदेश, वाढणारी नागरी वस्ती, कमी होणारे वनक्षेत्र, वृक्षतोड व जुन्या वृक्षांची कमी होत असलेली संख्या यामुळे या ‘हुदहूद’ पक्ष्यांचे दर्शन दुर्मिळ होत आहे.भारतामध्ये सर्वत्र आढळणारा सुतार पक्षी सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ जत तालुक्यासह पूर्वी शहरी भागात व ग्रामीण गावांलगतही तो आढळून यायचा. अगदी सहज झाडांच्या बुंध्याखाली, गवताळ प्रदेशात व गावातही त्याचे वास्तव्य होते. पूर्वी अधून-मधून अशा परिसरात त्याचे दर्शन व्हायचे. आता मात्र ‘हुदहूद’ हा पक्षी पहावयास मिळत नाही. सध्याच्या पिढीला तर फक्त पुस्तकातील चित्रातच हे पक्षी दाखवावे लागत आहेत. हा पक्षी आपल्या अणकुचीदार चोचीने गवताळ प्रदेशातील किडे, जमिनीतील गांडूळ, मुंग्या खातो, तर मध आणि फळांतील मगजही तो खातो. काहीवेळा बियाही खातो. मात्र सद्यस्थितीला सांगली जिल्ह्याच्या मिरज, कवठेमहांकाळ या तालुक्यातून शेतीचे वाढते क्षेत्र, गवताळ व कुरण क्षेत्रात झालेली प्रचंड घट, जुन्या झाडांची कत्तल यामुळे त्याला राहण्यास घरटे करता येत नाही. शिवाय झाडांच्या साली काढून त्याखालील वाळवी, किडे व मुंग्या खाता येतील, अशी झाडेच दिसत नाहीत. त्यांचे खाद्य व निवास या दोन्ही गरजा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पूर्वी पडीक क्षेत्र अधिक होते. पडीक रानात पाच, सहा महिने गवत उगवलेले असायचे. येथे किड्यांचीही निर्मिती मोठी होत असे. सध्या मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व जत परिसरात फळलागवड, ऊसशेती वाढत आहे. येथे पूर्वी वनक्षेत्र व कुरणाबरोबरच पेरू, बोरे, जांभळ, गावरान सीताफळे, गावरान आंबे अशी देशी फळांची झाडेही अधिक होती. आता या फळांची जागा द्राक्षबागा, चिकूबागा, आंब्याच्या बागा, भाजीपाला व फळभाज्या यांच्या शेतीने घेतली आहे. पक्ष्यांना उपयोगी ठरणारे गवताळ प्रदेश संपत चालले आहेत. तसेच झाडांचीही तोड सुरू आहे. पाण्याचे साठे कोरडे असतात. परिणामी त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मार्च ते आॅगस्ट हा त्यांचा वीण हंगाम असतो. मात्र त्यांची रोडावलेली संख्या, अपुरे खाद्य, निवासाची नष्ट झालेली ठिकाणे यामुळे त्यांचा वीण काळही धोक्यात असून, हे पक्षी कमी होत आहेत. आपण समजतो तो तुरा असलेला व लांब चोच असणारा व सुमारे १२ इंच लांबी असणारा पक्षी सुतार पक्षी नसून, त्याचे खरे नाव हुदहूद (लॅटीन : हुप्पू) असे आहे. सुतार पक्षी आकाराने लहान असतो. हुदहूद हा पक्षी गवताळ व वनक्षेत्रात नदी, तलाव परिसरात पाणी असणाऱ्या ठिकाणीही पाहायला मिळतो. वाढणारी फळशेती, गवताळ क्षेत्रातील घट आणि वाढणारी नागरी वस्ती यामुळे त्यांचे सहज होणारे दर्शन आता दुर्मिळ झाले आहे. त्यांना पाहायचे असल्यास आता तशा ठिकाणांची निवड करूनच त्यांचे दर्शन शक्य आहे.- शरद आपटे,पक्षीतज्ज्ञ, सांगली.