‘मी जबाबदार’ जनजागृतीपवर माहिती पत्रके वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:00+5:302021-06-16T04:31:00+5:30

कोल्हापूर : शहरात कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी व वीरशैव ...

Information leaflets will be distributed on 'I am responsible' public awareness | ‘मी जबाबदार’ जनजागृतीपवर माहिती पत्रके वाटणार

‘मी जबाबदार’ जनजागृतीपवर माहिती पत्रके वाटणार

googlenewsNext

कोल्हापूर : शहरात कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी व वीरशैव को-ऑप बँक याच्यामार्फत “मी जबाबदार” जनजागृतीविषयक माहितीपत्रक छापून महापालिकेकडे देण्यात आली. शहरातील व्यापारी व रहिवासी क्षेत्रात माहितीपत्रके वाटप करण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या पत्रकांचा स्वीकार केला. यावेळी राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक आणि विकास यंत्रणा व कोविड-१९ पुणे विभागीय जनजागृती समिती अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सूर्यकांत पाटील-बुध्दिहाळकर, अनिल सोलापुरे, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, अमरदीप पाटील, श्रीनिवास मालू, राजू वाली, स्वप्निल मुधाळे, विशाल वडेर, डॉ. भूषण शेंडगे, सचिन चिवळकर, आरोग्य निरीक्षक करण लाटवडे उपस्थित होते.

Web Title: Information leaflets will be distributed on 'I am responsible' public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.