शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

माणदेशी महिला खऱ्या अर्थाने कारभारणी : चेतना सिन्हा, राजर्षी शाहू मराठा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:18 AM

कोल्हापूर : माणदेशी महिला अशिक्षित असल्या, तरी त्या व्यवहारज्ञानात पुढे आहेत. त्या बळावरच त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून माणदेशी बॅँकेला परवाना ...

ठळक मुद्देमाणदेशी महिला खऱ्या अर्थाने कारभारणी : चेतना सिन्हाराजर्षी शाहू मराठा महोत्सव

कोल्हापूर : माणदेशी महिला अशिक्षित असल्या, तरी त्या व्यवहारज्ञानात पुढे आहेत. त्या बळावरच त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून माणदेशी बॅँकेला परवाना मिळविला. पाचवीला पुजलेल्या दारिद्र्य, अडचणी, संघर्ष व कष्टाला त्या आनंदाने सामोरे गेल्या; त्यामुळे माणदेशी परिसर जरी सधन नसला, तरी येथील महिला या खऱ्या अर्थाने मालकीन म्हणजे कारभारणी आहेत, असे गौरवोद्गार माण (जि. सातारा) येथील समाजसेविका चेतना सिन्हा यांनी काढले.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात शाहू स्मारक भवन येथे ‘महिला सबलीकरण’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महिला जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले, बीना देशमुख, दीपा ढोणे, सुनीता घाटगे, छाया पवार, तेजस्विनी नलवडे, वंदना भोसले, महापालिका अधिकारी निवास कोळी, आदींची होती.चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशी बॅँकेची संकल्पना सुचन्यामागे तेथील अशिक्षित व गरीब महिलांची धडपड कारणीभूत आहे. जिद्द, विनयशिलता व प्रामाणिकपणा या गोष्टींच्या बळावर या महिलांनी रिझर्व्ह बॅँकेलाही माणदेशी बॅँकेचा परवाना देणे भाग पडले. तो देताना अधिकाऱ्यांनी अशिक्षित महिलांना परवाना द्यायचा कसा? त्या कशा पद्धतीने कारभार करू शकतील. त्यावर या महिलांनी आमच्या काळात गावांमध्ये शाळाच नसल्याने आम्ही शिकू शकलो नाही; त्यामुळे आम्हाला लिहिता, वाचता येत नसले, तरी पैसे मोजता येतात, बॅँकेचे व्याजही मोजू शकतो या समर्पक व विचार करायला लावणाऱ्या उत्तराने अधिकारीही अवाक् झाले.

घिसाडी, मेंढपाळ, रोजगारावर जाणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन ही बॅँक निर्माण केली. स्वत:च्या मिळकतीतील पै अन् पै बचत करून सर्वांसमोर एक उदाहरण घालून दिले. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचाराने येथील मुले शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सातासमुद्रापार गेली आहेत. कष्ट आणि संघर्षातही आनंद मानून त्याला हसतच सामोरे जाणाºया या महिलांचा खरोखरच अभिमान वाटतो.त्या पुढे म्हणाल्या, आयुष्य हे एकदा मिळते, त्यामुळे ते मौल्यवान असून, स्वच्छंदी व मुक्तपणे जगून त्याचा आनंद घ्या. महिलांनी शिकून इतरांनाही शिकण्यास प्रेरणा द्यायला हवी.

भूक विसरण्यासाठी गातो गाणीमाणदेशी बॅँकेनंतर महिलांनी स्वत:चे रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. यामध्ये केराबाई सरगर या महिला स्वत: गाणी म्हणतात. त्याला श्रोतेही भरभरून दाद देतात. इतकी सुंदर गाणी कसे गाता? हा प्रश्न त्यांना विचारल्यावर वयाच्या ११ व्या वर्षी माझे लग्न झाले, गरोदर राहिल्यावर वारंवार लागणारी भूक विसरण्यासाठी मी गाणी म्हणायला लागले, असे सांगितले. यावरून ग्रामीण भागातील महिलांचे टॅलेंट दिसून येते, असे चेतना सिन्हा यांनी सांगितले. हा प्रसंग प्रत्येक महिलेसह माणसालाही अंतर्मुख व्हायला लावणारा असून, यामुळे उपस्थितांनाही गलबलून आले.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर