शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आकस्मिक, गंभीर आजारांमध्ये कोविडचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आकस्मिक आणि गंभीर आजारांमध्ये ‘कोविड १९’ चा समावेश ...

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आकस्मिक आणि गंभीर आजारांमध्ये ‘कोविड १९’ चा समावेश केला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या कोविडमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना या आदेशाचा लाभ होणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने २ सप्टेंबर २०२० पासून या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी एप्रिलपासून राज्यात कोविड १९ आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण केली. कोणालाच या आजाराबाबत फारशी माहिती नसताना संपूर्ण देश बंद ठेवण्यात आला. परंतु शासकीय पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र आवश्यक ती काळजी घेत दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. यातच राज्यातील अनेकांचा कोविडमुळे मृत्यूही झाला. अशांना शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात येत आहे.

परंतु ज्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली आणि त्यांना उपचारासाठी मोठा खर्च आला, अशांची मात्र कुचंबणा झाली. कारण वैद्यकीय बिलांच्या परिपूर्ततेसाठी असलेल्या २७ आकस्मिक आणि पाच गंभीर आजारांमध्ये कोविडचा समावेश नव्हता. अखेर सार्वत्रिक मागणीनंतर आरोग्य विभागाने १७ डिसेंबर २०२० रोजी याबाबतचा शासन आदेश काढून या आजाराचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

चौकट

ऑक्सिजन पातळी ९५ च्या खाली हवी

हा लाभ देताना मात्र ऑक्सिजनच्या पातळीची अट घालण्यात आली आहे. वैद्यकीय खर्च परिपूर्ततेसाठी रुग्ण कोविडबाधित असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद असणे आवश्यक आहे. तसेच त्याची ऑक्सिजन पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे.