वडणगेत ५० बेडच्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:48+5:302021-05-19T04:22:48+5:30

गावातील कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला आहे. गरीब रुग्णांना योग्य व मोफत उपचार मिळावेत यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके ...

Inauguration of 50 bed Covid Center at Wadang | वडणगेत ५० बेडच्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन

वडणगेत ५० बेडच्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन

Next

गावातील कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला आहे. गरीब रुग्णांना योग्य व मोफत उपचार मिळावेत यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके व पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित पाटील यांनी स्वखर्चातून कोविड सेंटर सुरू केले. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अशी कोविड सेंटर वरदान ठरणार असल्याचा विश्वास नरके यांनी यावेळी व्यक्त केला.

येथील देवी पार्वती हायस्कूलमध्ये 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 10 ऑक्सिजन बेड दोन दिवसांत प्रशासकीय मान्यता मिळताच ताबडतोब बनविण्यात येणार आहेत. मंगळवारी या कोविड सेंटरमध्ये दोन रुग्ण दाखल झाले आहेत. यावेळी बाजीराव पाटील, इंद्रजित पाटील, जिल्हा परिषद सदस्या कोमल मिसाळ, उपसरपंच पूजा मिसाळ, पोलीस पाटील उमेश नांगरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, सयाजी घोरपडे, दीपक व्हरगे, माणिक जाधव, सुनील पोवार, तसेच कृती समिती व कोरोना दक्षता समिती सदस्य राजू पोवार, दादासाहेब शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : १८ वडणगे कोविड सेंटर

ओळी :- वडणगे, ता. करवीर येथील कोविड सेंटरचे उद्घाटन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, इंद्रजित पाटील, कोमल मिसाळ, सभापती मीनाक्षी पाटील व उपसभापती अविनाश पाटील उपस्थित होते.

Web Title: Inauguration of 50 bed Covid Center at Wadang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.