शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 4:00 PM

राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची सत्ता काबीज केलेल्या भाजपाचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांची येत्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतच खरी कसोटी लागणार

राम मगदूमगडहिंग्लज: राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची सत्ता काबीज केलेल्या भाजपाचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांची येत्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतच खरी कसोटी लागणार आहे. कारखाना निवडणुकीतील मदतीच्या परतफेडीसाठी ते मुश्रीफांच्या पाठीशी राहणार की पक्षादेश मानून भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासोबत राहणार याचीच सर्वत्र चर्चा आहे.गेल्यावेळी कागल विधानसभेची निवडणूक मुश्रीफ यांच्याविरूद्ध भाजपा-शिवसेना युतीचे संजय घाटगे व अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांच्यात तिरंगी झाली होती. त्यात मुश्रीफ यांनी एकतर्फी बाजी मारली होती. यावेळी मुश्रीफ विरूद्ध समरजित यांच्यातच सरळ सामना होणार आहे.त्यासाठी समरजित हे जोरदार तयारी करीत आहेत. म्हणूनच  मुश्रीफांनी ‘गडहिंग्लज मध्ये बेरजेचे राजकारण केले आहे.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या उभारणीसाठी मदतीचा हात दिल्यामुळे मुश्रीफांचे पारंपारिक आणि कडवे विरोधक राहिलेले संजय घाटगे आता मुश्रीफांबरोबर आहेत. त्याप्रमाणे गडहिंग्लज साखर कारखान्याला ऊर्जितावस्था देण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी जिल्हा बँकेतून मदतीची ग्वाही दिल्यामुळे येत्या निवडणुकीत शहापूरकरदेखील मुश्रीफांच्या पाठीशीच राहण्याची शक्यता आहे.गेल्यावेळी गडहिंग्लज कारखान्यातील आघाडी आणि ‘ब्रिस्क फॅसिलिटीज’ कंपनीने भागवलेल्या कारखान्याच्या थकित देणीमुळे जनता दलाचे जेष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांना मुश्रीफांचा प्रचार करावा लागला होता.परंतु, कारखान्यातील संघार्षामुळे ते यावेळी 'आमने-सामने' येणे अपेक्षित होते. त्यामुळेच मुश्रीफांनी शहापूरकरांना जवळ केले आहे. परंतु, आगामी निवडणुकीमध्येच ‘मुश्रीफ-शहापूरकर’ मैत्रीची कसोटी लागणार आहे.भाजपला फटका शक्यगेल्यावेळी गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदे आघाडीविरूद्ध लढलेल्या शहापूकरांना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ताकद’ दिली होती. परंतु, मुश्रीफांनी यावेळी शहापूरकरांनाच सोबत घेतले. त्यांनाच अध्यक्षपद आणि भाजपचे दुसरे नेते प्रकाश चव्हाण यांना उपाध्यक्षपद देण्याचे जाहीर केल्यामुळे मंत्री पाटील व घाटगे यांना निवडणुकीपासून दूर रहावे लागले. त्याचाच फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.'कौलगे-कडगाव' या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मतदार संघात गेल्यावेळी मिळालेल्या पंचायत समितीच्या दोन्ही जागेसह थोडक्यात हुकलेली गिजवणे जिल्हा परिषदेची जागा आणि गडहिंग्लज नगरपालिकेच्या सभागृहात कोरी झालेली पाटी भरण्यासाठी यावेळी भाजपाला संघर्ष करावा लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे