आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 04:00 PM2022-11-12T16:00:51+5:302022-11-12T16:01:40+5:30

राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची सत्ता काबीज केलेल्या भाजपाचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांची येत्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतच खरी कसोटी लागणार

In the upcoming assembly elections, Dr. Prakash Shahapurkar Hasan Mushrif or Samarjit Ghatge who will be with him | आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार

आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज: राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची सत्ता काबीज केलेल्या भाजपाचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांची येत्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतच खरी कसोटी लागणार आहे. कारखाना निवडणुकीतील मदतीच्या परतफेडीसाठी ते मुश्रीफांच्या पाठीशी राहणार की पक्षादेश मानून भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासोबत राहणार याचीच सर्वत्र चर्चा आहे.

गेल्यावेळी कागल विधानसभेची निवडणूक मुश्रीफ यांच्याविरूद्ध भाजपा-शिवसेना युतीचे संजय घाटगे व अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांच्यात तिरंगी झाली होती. त्यात मुश्रीफ यांनी एकतर्फी बाजी मारली होती. यावेळी मुश्रीफ विरूद्ध समरजित यांच्यातच सरळ सामना होणार आहे.त्यासाठी समरजित हे जोरदार तयारी करीत आहेत. म्हणूनच  मुश्रीफांनी ‘गडहिंग्लज मध्ये बेरजेचे राजकारण केले आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या उभारणीसाठी मदतीचा हात दिल्यामुळे मुश्रीफांचे पारंपारिक आणि कडवे विरोधक राहिलेले संजय घाटगे आता मुश्रीफांबरोबर आहेत. त्याप्रमाणे गडहिंग्लज साखर कारखान्याला ऊर्जितावस्था देण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी जिल्हा बँकेतून मदतीची ग्वाही दिल्यामुळे येत्या निवडणुकीत शहापूरकरदेखील मुश्रीफांच्या पाठीशीच राहण्याची शक्यता आहे.

गेल्यावेळी गडहिंग्लज कारखान्यातील आघाडी आणि ‘ब्रिस्क फॅसिलिटीज’ कंपनीने भागवलेल्या कारखान्याच्या थकित देणीमुळे जनता दलाचे जेष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांना मुश्रीफांचा प्रचार करावा लागला होता.परंतु, कारखान्यातील संघार्षामुळे ते यावेळी 'आमने-सामने' येणे अपेक्षित होते. त्यामुळेच मुश्रीफांनी शहापूरकरांना जवळ केले आहे. परंतु, आगामी निवडणुकीमध्येच ‘मुश्रीफ-शहापूरकर’ मैत्रीची कसोटी लागणार आहे.

भाजपला फटका शक्य

गेल्यावेळी गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदे आघाडीविरूद्ध लढलेल्या शहापूकरांना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ताकद’ दिली होती. परंतु, मुश्रीफांनी यावेळी शहापूरकरांनाच सोबत घेतले. त्यांनाच अध्यक्षपद आणि भाजपचे दुसरे नेते प्रकाश चव्हाण यांना उपाध्यक्षपद देण्याचे जाहीर केल्यामुळे मंत्री पाटील व घाटगे यांना निवडणुकीपासून दूर रहावे लागले. त्याचाच फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.

'कौलगे-कडगाव' या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मतदार संघात गेल्यावेळी मिळालेल्या पंचायत समितीच्या दोन्ही जागेसह थोडक्यात हुकलेली गिजवणे जिल्हा परिषदेची जागा आणि गडहिंग्लज नगरपालिकेच्या सभागृहात कोरी झालेली पाटी भरण्यासाठी यावेळी भाजपाला संघर्ष करावा लागणार आहे.

Web Title: In the upcoming assembly elections, Dr. Prakash Shahapurkar Hasan Mushrif or Samarjit Ghatge who will be with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.