शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’च्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द, अवसायनातील; आजच्या सुनावणीकडे दूध संस्थांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:57 IST

ठराव मागणीची पत्रे तयार 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने संस्था प्रतिनिधी ठराव मागणीसाठी दाखल केलेल्या संस्थांच्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द व अवसायनातील आहेत. त्या संस्थांना वगळून इतर दूध संस्थांकडे ठराव मागितले जाणार असून दुग्ध विभागाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. सोमवारपासून (दि. ९) ठराव मागवले जाणार आहेत.‘गोकुळ’ दूध संघाने ५४७० संस्था सभासदांची यादी दुग्ध विभागाकडे पाठवली आहे. या यादीच्या पडताळणीचे काम केली आठ दिवस दुग्ध विभागात सुरू होते. गेल्या पाच वर्षांत दूध नसल्याने व्यवहार ठप्प झालेल्या, लेखापरीक्षण पूर्ण नसलेल्या, निवडणूक घेतलेली नाही यासह विविध कारणांनी ज्या दूध संस्थांची नोंदणी रद्द होऊन अवसायनात काढल्या आहेत. साधारणता पाचशेहून अधिक दूध संस्थांवर दुग्ध विभागाने गेल्या तीन-चार वर्षांत कारवाई केली आहे. यातील बहुतांशी संस्था ‘गोकुळ’ दूध संघाने यापूर्वीच यादीतून काढून टाकलेेल्या आहेत. तरीही संघाकडून प्राप्त ५४७० संस्था सभासदांच्या यादीची पडताळणी करून त्यातून ६२ संस्थांना वगळण्यात आल्याचे समजते. उर्वरित संस्थांकडे प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागणी केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया साेमवारपासून सुरू होणार आहे.दरम्यान, संघाच्या यादीतील १२०० दूध संस्थांवर आजरा तालुक्यातील एका दूध संस्था प्रतिनिधींनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे हरकत घेतली आहे. त्यावर, आज, शनिवारी सुनावणी होत असून, न्यायालय काय आदेश देते? याकडे जिल्ह्यातील दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 62 Gokul Dairy Societies' Registration Cancelled; Hearing Today

Web Summary : 62 Gokul dairy societies face cancellation. The dairy department prepares to request resolutions from remaining societies starting Monday. A hearing today addresses objections to 1200 societies; its outcome is keenly awaited by district dairy cooperatives.