Kolhapur: ‘गोकुळ’च्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द, अवसायनातील; आजच्या सुनावणीकडे दूध संस्थांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:57 IST2026-03-07T11:57:13+5:302026-03-07T11:57:30+5:30

ठराव मागणीची पत्रे तयार 

In the list of organizations filed by Gokul Dudh Sangh for the organization representative resolution, 62 organizations have been deregistered and are in the process of being defunct | Kolhapur: ‘गोकुळ’च्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द, अवसायनातील; आजच्या सुनावणीकडे दूध संस्थांच्या नजरा

Kolhapur: ‘गोकुळ’च्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द, अवसायनातील; आजच्या सुनावणीकडे दूध संस्थांच्या नजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने संस्था प्रतिनिधी ठराव मागणीसाठी दाखल केलेल्या संस्थांच्या यादीत ६२ संस्था नोंदणी रद्द व अवसायनातील आहेत. त्या संस्थांना वगळून इतर दूध संस्थांकडे ठराव मागितले जाणार असून दुग्ध विभागाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. सोमवारपासून (दि. ९) ठराव मागवले जाणार आहेत.

गोकुळ’ दूध संघाने ५४७० संस्था सभासदांची यादी दुग्ध विभागाकडे पाठवली आहे. या यादीच्या पडताळणीचे काम केली आठ दिवस दुग्ध विभागात सुरू होते. गेल्या पाच वर्षांत दूध नसल्याने व्यवहार ठप्प झालेल्या, लेखापरीक्षण पूर्ण नसलेल्या, निवडणूक घेतलेली नाही यासह विविध कारणांनी ज्या दूध संस्थांची नोंदणी रद्द होऊन अवसायनात काढल्या आहेत. साधारणता पाचशेहून अधिक दूध संस्थांवर दुग्ध विभागाने गेल्या तीन-चार वर्षांत कारवाई केली आहे. 

यातील बहुतांशी संस्था ‘गोकुळ’ दूध संघाने यापूर्वीच यादीतून काढून टाकलेेल्या आहेत. तरीही संघाकडून प्राप्त ५४७० संस्था सभासदांच्या यादीची पडताळणी करून त्यातून ६२ संस्थांना वगळण्यात आल्याचे समजते. उर्वरित संस्थांकडे प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागणी केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया साेमवारपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, संघाच्या यादीतील १२०० दूध संस्थांवर आजरा तालुक्यातील एका दूध संस्था प्रतिनिधींनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे हरकत घेतली आहे. त्यावर, आज, शनिवारी सुनावणी होत असून, न्यायालय काय आदेश देते? याकडे जिल्ह्यातील दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title : कोल्हापुर: 'गोकुल' की 62 डेयरी सोसाइटियों का पंजीकरण रद्द; आज सुनवाई

Web Summary : गोकुल की 62 डेयरी सोसाइटियों का पंजीकरण रद्द हुआ। डेयरी विभाग सोमवार से शेष सोसाइटियों से प्रस्ताव मांगने की तैयारी कर रहा है। आज 1200 सोसाइटियों पर आपत्तियों पर सुनवाई है; जिले की डेयरी सहकारी समितियों को इसके परिणाम का इंतजार है।

Web Title : Kolhapur: 62 Gokul Dairy Societies' Registration Cancelled; Hearing Today

Web Summary : 62 Gokul dairy societies face cancellation. The dairy department prepares to request resolutions from remaining societies starting Monday. A hearing today addresses objections to 1200 societies; its outcome is keenly awaited by district dairy cooperatives.