शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:37 IST

सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर : विधान परिषदेप्रमाणे ‘उत्तर’ची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव घेऊन मुंबईत पालकमंत्री सतेज पाटील भेटले. परंतु विधान परिषदेवेळी आम्हाला तीन जागा बिनविरोध करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही तयार झालो. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप ही निवडणूक लढवणार असल्याचे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात बोलताना सांगितले.यावेळी चंद्रकांत पाटील यांना भाजप उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी आम्ही सत्यजित कदम आणि महेश जाधव या दोघांची नावे दिल्लीला पाठविली आहेत. त्यातील आमचे पसंतीचे नाव म्हणून कदम यांच्या नावाची आम्ही शिफारस केली आहे; परंतु अधिकृत निर्णय दिल्लीतच होणार आहे. उशीर झाला तरी उद्या सकाळपर्यंत निर्णय होईल असे सांगितले.ते म्हणाले, बिनविरोध त्याचवेळी होईल. जेव्हा जयश्री जाधव या भाजपच्या चिन्हावर लढतील आणि दोन्ही काँग्रेस पाठिंबा देतील. सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.कोणत्या विषयावर निवडणूक लढवणार, असे विचारल्यानंतर पाटील म्हणाले, खूप विषय आहेत. अनेक वर्षे डोक्यावर बसला असता तो टोल आम्ही घालवला आहे. तीर्थक्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा आराखडा करून निधी देण्यास सुरुवात केली; परंतु महाविकास आघाडीला तो पुढे देता आला नाही. महापालिकेत यांनी पाच वर्षांत दाखवण्याजोगं काय काम केलं, भूखंडाच्या भ्रष्टाचाराही मुद्दा यात येणार आहे. राजू शेट्टी भाजपसोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस