शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी; ..अन्यथा हायवेवर होईल एक हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:23 IST

अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियानाचे प्रबोधन आता संपले आले. आजपासून (सोमवार) राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करणार आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट नसलेल्यांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.प्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ प्रबोधनाची मोहीम आठवडाभर राबविली. त्यात १२०० वाहनांची तपासणी झाली असून ४३५ वाहनधारकांनी हेल्मेट घातले नसल्याचे निदर्शनास आले. ‘हेल्मेट वापरा, जीवन वाचवा’ असा संदेश देऊन मोहिमेत हेल्मेट परिधान केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर हेल्मेट नसलेल्यांचे मी हेल्मेट वापरणार, अशा आशयाचा फलक त्यांच्या हाती देऊन छायाचित्र घेऊन प्रबोधन केले.आता ही प्रबोधन मोहीम थांबणार असून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरील दोघांनाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

हेल्मेट सक्ती का?जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे.

पहिल्या टप्प्यात किणी टोल नाकाकारवाईसाठी पहिल्या टप्प्यात किणी टोल नाका येथे प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर कागल येथील आरटीओ तपासणी नाका येथे कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. त्या ठिकाणी दोन मोटारवाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

रडार यंत्रणेची वैशिष्ट्ये

  • इंटरसेप्टर वाहनांत रडार यंत्रणा, वाय- फाय, एनपीआर कॅमेरा.
  • एनपीआर, कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाने रात्रीच्या वेळेसही प्रभावी कारवाई.
  • अधिकाऱ्यांना कारवाईसाठी एक विशिष्ट क्षेत्र निश्चित करावे लागणार.
  • रडार प्रणालीद्वारे वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित पद्धतीने नजर.
  • नियमभंग वाहनचालकांवर ऑटोमॅटिक दंड.

आठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी इंटरसेप्टर वाहने कोल्हापूर परिवहन कार्यालयाला मिळाली.
  • यावर अत्याधुनिक रडार यंत्रणा २ बसविली आहे. यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण आठ मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांना दिले आहे.

दोन अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई होईल. हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंडाची पावती केली जाईल. हा दंड भरला नसल्यास परिवहन विभागाकडील त्या वाहनधारकांचे कोणतेही काम होणार नाही. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Important News for Bikers: ₹1000 Fine on Highway Without Helmet

Web Summary : Kolhapur enforces helmet rule on highways. ₹1000 fine for no helmet. Advanced radar system to be used. The initiative aims to reduce accidents and fatalities caused by head injuries. Enforcement starts at Kini toll plaza, then RTO check post.