शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी महासम्राटाला विसर्जित करा

By admin | Updated: September 7, 2015 00:49 IST

मजूर संघाची सभा : उदय जोशी यांची मुकुंद पोवार यांच्यावर टीका

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत संस्था कशी चालविली जाते हे विरोधकांना दाखवून दिले आहे तरीही ज्यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक केला, अशी मंडळी ‘विरोधाला विरोध’ म्हणून काही मंडळी टीका करीत सुटली आहे, अशा महासम्राटांना विसर्जित करा, अशी टीका मजूर संघाचे अध्यक्ष उदय जोशी यांनी केली. संघाची सभा शाहूपुरी येथील संस्था कार्यालयात रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविकात अहवाल सालातील कामकाजाचा आढावा घेत अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, विरोधकांची दहा वर्षे संघावर सत्ता होती, त्यावेळी त्यांनी काय उजेड पाडला हे सभासदांना माहीत आहे. मुकुंद पोवार यांच्या गाडीचा खर्च साडेचार लाख रुपये होता. आमच्या दोन वर्षांतील कारभाराचा आढावा घेतल्यास पारदर्शक कारभार कशाला म्हणतात, हे सभासदांना दिसेल. सभासद संस्थांना दोन वर्षांत शंभर कोटींच्या कामांचे वाटप केले आहे. प्रत्येक संस्थेला किमान ५० लाखांचे काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण, विरोधकांनी केवळ न्यायालयीन प्रक्रियेत संस्थेला अडकून टाकण्याचा उद्योग केला आहे. माझी त्यांना विनंती आहे, न्यायालयातील सर्व दावे त्यांनी मागे घ्यावेत, निष्कारण संस्थेला खर्चात पाडू नये, असे आवाहनही उदय जोशी यांनी केले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसले तरी आगामी काळात सभासद हिताचेच निर्णय आमच्या हातून घेतले जातील. सभासदांनी निवडणुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जोशी यांनी केले. जयसिंग पाटील म्हणाले, सत्तारूढ गटाने कारभार चांगला केला आहे. निवडणुकीसाठी त्यांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे, एकत्र बसण्यास हरकत नाही. संचालक भीमराव नलवडे यांनी आभार मानले. तुकाराम पाटील, बाळासाहेब जंगन्नवार, आप्पासाहेब पाटील, वाय. व्ही. पाटील, महादेव सांगले, रमेश साळोखे, नारायण देसाई, जयसिंग चव्हाण, सुरेश पाटील, बबन कोळी, सुभाष साळोखे, राजू मोहिते, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)निवडणुकीवरच चर्चा!मजूर संघाची सर्वसाधारण सभा असल्याने अहवाल सालातील कामकाजावर चर्चा अपेक्षित होती. कामकाजावर कमी आणि निवडणुकीवरच सभेत अधिक चर्चा झाली.