शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नाईट लँडिंगसाठी येणारे शक्य ते अडथळे त्वरित दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर विमानतळावर होणाऱ्या मोठ्या विमानांच्या नाईट लँडिंगमध्ये काही अडथळे येत आहेत. या अडथळ्यांबाबत दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार ...

कोल्हापूर विमानतळावर होणाऱ्या मोठ्या विमानांच्या नाईट लँडिंगमध्ये काही अडथळे येत आहेत. या अडथळ्यांबाबत दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अडथळ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याचे नियोजन केले होते. यानुसार रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक, आमदार पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन अडथळ्यांची पाहणी केली. या अडथळ्यांमध्ये वीजचे खांब, झाडे, उंच इमारती, पाण्याची टाकी, जाहिरातींचे फलक, मोबाईल टॉवर यांचा समावेश आहे. यापैकी विजेचे खांब, झाडे, जाहिरातींचे फलक हे अडथळे हटवणे तत्काळ शक्य असल्याने ते त्वरित हटवावेत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर शाहू जकात नाका परिसरातील वैभव हाऊसिंग सोसायटी टेकडावर वसलेली असल्याने तेथील घरांसह इलेक्ट्रिक पोल, मोबाईल टॉवरचा अडथळा निर्माण झाल्याने तेथील मिळकत धारकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार मंडलिक यांनी विमान प्राधिकरणाच्या सर्व्हे टीमला परत एकदा बोलावून त्यांच्याशी प्रत्यक्ष अडथळ्यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा भेट देऊन चर्चा करून या अडथळ्यांबाबत इतर काही मार्ग काढता येईल का? याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी आर्किटेक्ट महेश नामपूरकर, विमान प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

चौकट

धावपट्टी विस्तारीकरणाबाबत चर्चा

आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानतळाच्या प्रलंबित कामांबाबत विमानतळ प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी विमानतळ अंतर्गत करण्यात येणारे सुशोभीकरण, नाईट लँडिंगसाठी करावी लागणारी विविध उपाययोजना, धावपट्टीचे विस्तारीकरण, अन्य विकास कामांबाबत विमान प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांच्याशी चर्चा केली.

फोटो (३००५२०२१-कोल-विमानतळ पाहणी ०१) : कोल्हापुरात रविवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानमार्गातील अडथळ्यांची पाहणी केली.

===Photopath===

300521\30kol_1_30052021_5.jpg

===Caption===

फोटो (३००५२०२१-कोल-विमानतळ पाहणी ०१) : कोल्हापुरात रविवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानमार्गातील अडथळ्यांची पाहणी केली.