शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सांगाव आरोग्य केंद्र आजारी

By admin | Updated: March 5, 2016 00:12 IST

रुग्णवाहिकेचा चालक गायब : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन आरोग्य सेविकांची पदे रिक्त

बाबासाहेब चिकोडे -- कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेविका, एक आरोग्य सहायिका, अशी चार पदे गत आठ ते दहा महिन्यांपासून रिक्त आहेत. तर रुग्णवाहिकेचा चालक सहा महिन्यांपासून केंद्राकडे फिरकलाच नसल्याने हे प्राथमिक रुग्णालयच आजारी पडले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कसबा सांगावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजारांपर्यंत आहे. येथील आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ९ गावे, आठ उपकेंद्र व १५ आरोग्य सहायक व सहायिका आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत पंचतारांकित औद्योगिक वसाहत, दोन धरणग्रस्त वसाहती आहेत. त्यामुळे येथे दररोज सुमारे ९० ते १०० बाह्यरुग्ण तपासले जातात. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत; मात्र वैद्यकीय अधिकारी एस. व्ही. पाटील यांची बदली आठ महिन्यांपूर्वी झाली आहे. त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही, तर मुख्यालयातील आरोग्य सेविकेची बदली कागल येथे दहा महिन्यांपूर्वी झालेली आहे. तसेच दुसऱ्या आरोग्य सहाय्यिकेची बदली कागल येथे बी.एन.ओ. म्हणून पूर्ण वेळेकरिता सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाली आहे. या ठिकाणी १ जून २०१५ रोजी सेनापती कापशी प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत बेलेवाडी मासा उपकेंद्रातील कुसुमबी मुल्ला यांची बदली झाली आहे. मात्र, मुल्ला नऊ महिने होऊनही हजर झालेल्या नाहीत. तसेच सुळकूड उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची शिंगणापूर येथे पूर्ण वेळ प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यामुळे येथे एकूण चार जागा रिक्त आहेत.सहा महिन्यांपूर्वी येथील रुग्णवाहिकेवर दशरथ शामराव तराळ यांची चालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, हजर झाल्यानंतर पुन्हा केंद्राकडे फिरकलेच नाहीत. रजा नामंजूर करून तसेच त्यांना कामावर हजर राहण्याची लेखी नोटीस पाठवून ते गैरहजर आहेत, त्यामुळे येथील रुग्णवाहिका बंद असल्याने गरोदर माता अत्यावश्यक रुग्णांना तालुका जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी येत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाचही जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.नोटिसीला दाद नाहीश्रीमती मुल्ला यांना हजर होण्यासाठी अनेक वेळा नोटिसा पाठवून तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही मुल्ला यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही त्या अद्याप या ठिकाणी हजर झाल्या नाहीत. तसेच चालक तराळ यांनाही नोटिसा व कारणे दाखवा नोटीस पाठवूनही त्यांनी यास दाद दिली नाही.