शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ

By admin | Updated: July 10, 2015 00:08 IST

जयंत पाटील यांचे आश्वासन : चंदगड येथे राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ता बैठक

चंदगड : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था दौलत बंद झाल्याने दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांची असलेली दौलत शेतकऱ्यांच्याच मालकीची राहावी, यासाठी पूर्वी आमच्या उद्योग समूहाद्वारे चालवायला घेण्याची तयारी होती; पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे आम्ही माघार घेतली; पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा बँकेने सहकार्य करण्याची हमी दिली, तरच दौलत चालवायला घेऊ, असे आश्वासन माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले.चंदगड येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील होते.पाटील म्हणाले, दौलत बंद पडल्याने व एव्हीएच उभा राहिल्याने तालुकावासीय अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने ‘एव्हीएच’च्या विरोधात पहिल्यापासून भूमिका घेतली आहे. ती आजही कायम असून, येथील जनतेबरोबर आपण व आपला पक्ष असल्याचे सांगितले.ते म्हणाले की, विरोधी बाकावर असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि कंपनी कापसाला सहा हजार व उसाला तीन हजार रुपये दर मागत होते; पण हेच महाशय सत्तेत आल्यानंतर कापसाला ३८०० रुपये दर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तर साखर उद्योगाची अवस्था दयनीय केली आहे. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्याप्रमाणे उसाला कमी दर मिळाल्यास शेतकरी ऊसपीक घेणेच बंद करतील. त्यामुळे साखर उद्योगाबाबत अवकळा येऊन बेकारी वाढणार आहे. ज्या जनतेने शिवसेना-भाजपला सत्तेत बसविले, त्यांना या आठ महिन्यांत या सरकारची अनेक रूपे पाहायला मिळत आहेत, असे सांगून हे सरकार विकास करणारे नसून, घोटाळे करणारे असल्याचा टोलाही लगावला.यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दौलत सुरू व्हावा व एव्हीएच बंद व्हावा, ही आपली पहिल्यापासून भूमिका असून, त्यासाठी प्रयत्नशील आहे. एव्हीएच हटविणे हे आपले ध्येय आहे. एव्हीएचची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, जनतेच्या पाठबळावरच एव्हीएच हटविणारच असल्याचे सांगितले.यावेळी विष्णू गावडे, बसवंत अडकूरकर, एम. जे. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबूराव हळदणकर, शिवाजी तुपारे, पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा नाईक, गोपाळ ओऊळकर, अनुराधा पाटील, दयानंद काणेकर, अरुण पिळणकर, श्रीशैल नागराळ, उदय जोशी, बी. डी. पाटील, सिकंदर नाईक, विलास पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. रामराजे कुपेकर यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील ‘दौलत’ व ‘एव्हीएच’च्या परिस्थितीची माहिती कथन केली.दरम्यान, माजी मंत्री जयंत पाटील यांनी हलकर्णी येथील दौलत कार्यस्थळाला भेट देऊन कारखान्याची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)