शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी केल्यास आवाडेंना पाठिंबा

By admin | Updated: December 11, 2015 00:54 IST

महादेवराव महाडिक : अनेकांच्या भेटी व चर्चेतून निर्णय; विधान परिषद निवडणूक

इचलकरंजी : विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे व आपण अशा दोघांनाही कॉँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. मी निवडणूक लढविण्याची तयारी केली असली तरी आवाडे बंडखोरी करणार असतील तर मी त्यांना पाठिंबा देईन, असे प्रतिपादन आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी येथे केले.विधान परिषदेसाठी अपक्ष म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार महाडिक यांनी प्रथमत: इचलकरंजीस भेट दिली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरणाऱ्या येथील शहर विकास आघाडीच्या उमेदवार ध्रुवती दळवाई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पोवार, आदींसह अन्य नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार महाडिक म्हणाले, कॉँग्रेसकडे आम्ही तिघांनी (पी. एन. पाटील, महाडिक व आवाडे) उमेदवारी मागितली होती. तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, त्यास अन्य दोघे पाठिंबा देतील, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते; पण तिघांनाही डावलण्यात आले. कॉँग्रेसने माझ्यावर अन्याय केला. त्यामुळे मला बंडखोरी करावी लागली. मात्र, मला कॉँग्रेससह सर्व पक्षांतील मतदारांचा पाठिंबा मिळतो आहे. प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक तरी मत मला जास्त मिळेल आणि माझा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (पान ४ वर)सतेज यांचे आवाडेंच्या माघारीसाठी प्रयत्नकोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसचे या निवडणुकीतील उमेदवार सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्यांनी बुधवारी अर्ज दाखल केल्यानंतर लागलीच मुंबई गाठली आहे. / वृत्त ४आवाडे पिता-पुत्रांची भेट झाली नाहीगुरुवारच्या इचलकरंजी भेटीच्या दरम्यान आमदार महाडिक यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे दिल्लीमध्ये असल्यामुळे, तर प्रकाश आवाडे हे कौटुंबिक कार्याच्या निमित्ताने बाहेर असल्याने दोघेही निवासस्थानी त्यांना भेटू शकले नाहीत. यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज निर्णयछाननीत सर्व बाराही उमेदवारांचे अर्ज वैध