मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना एक लाखाचे ‘प्रोत्साहन’ देईन : मंत्री हसन मुश्रीफ -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:44 IST2025-07-28T11:51:54+5:302025-07-28T12:44:19+5:30

कोल्हापुरातील शेतकरी बहाद्दूर; ‘केडीसीसी’ची ९१ टक्के वसुली

If I become the Chief Minister I will give farmers an incentive of one lakh says Minister Hasan Mushrif | मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना एक लाखाचे ‘प्रोत्साहन’ देईन : मंत्री हसन मुश्रीफ -video

मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना एक लाखाचे ‘प्रोत्साहन’ देईन : मंत्री हसन मुश्रीफ -video

कोल्हापूर : कर्जमाफीची चर्चा सुरू झाली की, शेतकरी कर्ज भरत नाहीत. ‘प्रहार’चे माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीचे आंदोलन केल्याने राज्यातील वित्तीय संस्थांचे ३८ हजार कोटी थकल्याचे वाचण्यात आले. मात्र, माझा कोल्हापूर जिल्ह्यातील बहाद्दूर शेतकरी आहे, त्याला फुकटचे काहीच नको असते, म्हणूनच यावर्षी ‘केडीसीसी’ बँकेची वसुली ९१ टक्के झाली. भविष्यात मी मुख्यमंत्री झालो तर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान देईन, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मंत्री मुश्रीफ हे शनिवारी कागल तालुक्यातील एका सत्कार समारंभात बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमची अडचण असली तरी आम्ही कर्जमाफी अनेकदा केली आहे. पण, कर्जमाफीबाबत माझं मत वेगळं आहे. कर्जमाफी करणार म्हटलं की, शेतकरी कर्ज भरत नाहीत. त्यामुळे बँका अडचणीत येतात. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. नाहीतर नुसती कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील.

मुश्रीफ-घाटगे युतीचे संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार संजय घाटगे व आम्हाला हातात हात घालून काम करायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये काही मतभेद असतील तर आम्ही दोघे बसून मिटवणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: If I become the Chief Minister I will give farmers an incentive of one lakh says Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.