शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीच्या नावाखाली ‘मस्ती’ केल्यास गुन्हे

By admin | Updated: August 18, 2015 00:44 IST

विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे

कोल्हापूर : करवीर तालुक्यात कुठेही चोरांचा सुळसुळाट नाही. सांगरूळ, आमशी, म्हारूळ, खाटांगळे, कसबा बीड, खुपिरे, वरणगे, वडणगे, आंबेवाडी, केर्ली, बालिंगा, दोनवडे, आदी परिसरांत चोरांचा वावर असल्याची अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, ग्रामस्थांनी गावांतून रात्रग्रस्त घालू नये, त्यांनी स्वत:च्या घरांचे रक्षण करावे, विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिला आहे. दुष्काळामुळे बिहार, उस्मानाबाद येथील चोरट्यांच्या टोळ्या गावा-गावांत फिरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावा-गावात लोक गस्त घालत आहेत. मात्र, या गस्तीमुळे नोकरीवरून घरी जाणाऱ्या लोकांना अडवून त्रास देणे, चोर समजून निरपराध नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार झाल्यास किंवा गस्तीसाठी रस्त्यावर धारदार हत्यारे घेऊन रस्त्यावर फिरल्यास येथून पुढे गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा ढोमे यांनी दिला आहे. एखादी व्यक्ती संशयितरीत्या दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. ग्रामस्थांनी आपापल्या घरामध्ये रात्रीच्या वेळी शांत झोप घ्यावी. चोरांच्या नावाखाली एकमेकांच्या वैमनस्याच्या डावपेचातून काही लोक घरांवर दगड मारण्याचे प्रकार करत असल्याचे समजते. असे प्रकार गावागावांत घडत असून यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ढोमे यांनी सांगीतले.