शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

सीसीटीव्ही बंद केल्यास पुजाऱ्यांवर फौजदारी दाखल करु : महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:37 PM

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे.

ठळक मुद्देदेवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी दिला पुजाऱ्यांना इशारा...तर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

कोल्हापूर, दि. २७ : सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरातील पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना पुजाऱ्याना इशारा दिला.कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत, मात्र गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसवताच पुजाºयांनी हे चारही कॅमेरे परस्पर बंद केल्याने गुरुवारी रात्री गोंधळ माजला.

हे कॅमेरे सुरु करण्याचे आणि बंद करण्याचे अधिकार देवस्थान समितीला असल्यामुळे पुजाऱ्याना या कॅमेऱ्याबाबत आक्षेप घेता येणार नाही, अशी भूमिका देवस्थान समितीने घेतल्याने हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गाभाऱ्यातील हालचालींवर देवस्थानच्या कार्यालयासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधूनही लक्ष ठेवता येणार आहे. कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराप्रमाणे देवीच्या गाभाऱ्यातही सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होती. त्यासाठी विविध संस्था-संघटनांनी आंदोलनेही केली होती.

मंदिरातील गाभाऱ्याची नियमित देखभाल होते की नाही, आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत की नाही यासह विविध गोष्टींबाबत सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी जोर धरत होती. खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या गोष्टीचा पाठपुरावा करून सीसीटीव्हीबाबत देवस्थान समिती व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्रौत्सवाआधी गाभाऱ्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु तांत्रिक कारणांस्तव गाभाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने कॅमेरे बसविण्यात आले नव्हते.

पहिल्या टप्प्यामध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; पण ते पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत अथवा त्यांचे प्रक्षेपण जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पाहता येत नाही, असा आरोप काही भक्त समित्यांकडून केला जात होता.

या दोन कॅमेऱ्यासह आणखी दोन कॅमेरे गुरुवारी देवस्थान समितीकडून गाभाऱ्यामध्ये बसविण्यात आले. पूर्वीच्या कॅमेऱ्यातील तांत्रिक दोषांचेही निवारण करण्यात आले असून, एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित झाले आहेत.

अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाच्या मुख्य उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गाभाºयामध्ये आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत का?, मूर्तीची व गाभाऱ्याची स्वच्छता नियमित ठेवली जात आहे की नाही, यावर लक्ष राहावे यासाठीच कॅमेरे बसविल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Templeमंदिरkolhapurकोल्हापूर