इचलकरंजीत महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

By Admin | Updated: September 6, 2015 00:34 IST2015-09-06T00:34:38+5:302015-09-06T00:34:38+5:30

भितीचे वातावरण : जिल्ह्यांत १६ रुग्णांना लागण

Ichalkaranjita woman's swine flu death | इचलकरंजीत महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

इचलकरंजीत महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

कोल्हापूर : इचलकरंजी शांतीनगर येथे राहणाऱ्या महिलेचा स्वाइन फ्लूने शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. वैशाली दिलीप केंगार (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. इचलकरंजीमध्ये या वर्षी पहिलाच रुग्ण स्वाइन फ्लूने दगावल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हयात २९ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. आतापर्यंत २७ रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. या साथीच्या आजाराने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
वैशाली केंगार या अशक्तपणा आल्यामुळे इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्याने आठ दिवसांपूर्वी त्यांना कोल्हापुरातील कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी त्यांची प्रकृती जास्तच खालावली. त्यानंतर त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे व दीर असा परिवार आहे.
वातावरणाच्या परिणामामुळे जिल्हयात स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. जिल्हयात २९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. आतापर्यंत २७ रुग्ण मृत झाले आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Ichalkaranjita woman's swine flu death