शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी नगरपालिकेचे ४३७.३२ कोटींच्या अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सभेत सन २०२१-२२ सालाचे ४३७ कोटी ३२ लाख ५२ हजार ७७८ रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सभेत सन २०२१-२२ सालाचे ४३७ कोटी ३२ लाख ५२ हजार ७७८ रुपये जमाखर्चाचे आणि ८५ कोटी ६७ लाख ४१ हजार ५६७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक दीड तासाच्या चर्चेनंतर बहुमताने मंजूर केले. गतवर्षीच्या तुलनेत कमी रकमेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याने विरोधकांनी शहर प्रगतीकडे चालले आहे की, अधोगतीकडे असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

नगरपालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक अंदाजपत्रक व विविध ८३ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये सन २०२०-२१ चे दुरूस्त आणि २०२१-२२ चे वार्षिक अंदाजपत्रक मांडण्यात आले. त्यावर चर्चा करताना नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी, गेल्या वर्षी ५९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. तो कमी करून यंदा ४३७ कोटींवर कसा आला, कोणत्या बाबी यामध्ये कमी झाल्या अथवा वगळल्या, जमेच्या बाजूला निधी किती शिल्लक आहे, याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे खर्चाच्या बाजूला अधिक निधीची तरतूद दिसते. उत्पन्न वाढीचे उपाय सुचविण्यात आले नाहीत. खासदार-आमदार यांच्या निधीतील कामांसाठी हिश्श्याची तरतूद नाही, अशा कमतरता मांडल्या.

नगरसेवक शशांक बावचकर यांनी हा अर्थसंकल्प बोगस व फुगीर आकडेवारीचा खेळ असल्याचा आरोप केला. त्यामध्ये नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश नाही. नगरपालिकेत तीन पक्षांची सत्ता असताना अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प सादर करता आला नाही. स्थायी समितीने सुचविलेल्या अंदाजपत्रकात तब्बल ३२.७६ कोटींची वाढ केली आहे. सुळकूड पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद नाही, अशा त्रुटी मांडल्या.

त्यावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला गती देणारा व सर्वसामान्य जनतेवर कोणत्याही प्रकारची करवाढ न लादणारा असल्याचे सांगितले. तसेच नावीन्यपूर्ण योजना आखण्यात येणार असून, मोठ्या अनुदानाची गरज असल्याने त्यासाठी विविध हेडखाली अनुदानाची तरतूद केल्याचे सांगून एकमताने मंजुरी देण्याची विनंती केली. त्यावर दीड तास चर्चा झाल्यानंतर हा विषय मतदानाला घेण्यात आला. त्यावर २९ विरूद्ध १३ मतदान होऊन सत्ताधारी पक्षाने बहुमताने विषय मंजूर केला. यावेळी तीन नगरसेविका तटस्थ राहिल्या. चर्चेत मदन कारंडे, सागर चाळके, सुनील पाटील, अजित जाधव, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, आदींनी भाग घेतला.

फोटो ओळी

२६०२२०२१-आयसीएच-०८

इचलकरंजी नगरपालिका सर्वसाधारण सभेत वार्षिक अंदाजपत्रकावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके व शशांक बावचकर यांनी मते व्यक्त केली.

छाया-उत्तम पाटील