इचलकरंजी : महाराष्ट्राच्या मँचेस्टरची पहिल्या महापालिकेची निवडणूक ४३ जागा जिंकत भाजपने एकतर्फी जिंकली. केंद्रात, राज्यात आम्हीच, त्यामुळे शहराच्या विधायक विकासाचे आम्हीच मानकरी ठरू शकतो, यासाठी आम्हाला साथ द्या, या प्रचाराला इचलकरंजीच्या मतदारांनी प्रतिसाद देत भाजपला भरभरून मतदान केले. विरोधी शिव-शाहू आघाडीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.सुरुवातीपासूनच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली. शेवटपर्यंत ही घोडदौड एकहाती सत्तास्थापन करण्यापर्यंत पोहोचली. सोबतीला घटक पक्ष म्हणून असणाऱ्या शिंदेसेनेला ३, तर राष्ट्रवादी (अजित पवार)ला एका जागेवर समाधान मानावे लागले. परंतु, सर्वाधिक उमेदवार देण्यापासून आग्रही असलेला भाजप उमेदवार विजयातही आघाडीवर राहिला, हे या निकालाचे वैशिष्ट्य ठरले.महायुतीचे नेतृत्व करणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, रवींद्र माने, अशोक जांभळे यांनी सुरुवातीपासून प्रचारात आक्रमक भूमिका घेतली, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले होते. माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे, शशांक बावचकर, सागर चाळके, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेत कसलीही कसूर ठेवली नाही. त्यामुळे महायुतीच्या बलाढ्य शक्तीपुढे आव्हान निर्माण झाले होते. सुरुवातीला सर्व ठिकाणी आघाडी उमेदवार उभे करू शकत नाहीत, त्यांच्याकडे एवढी क्षमता नाही, अशी हवा महायुतीने केली होती; पण ती फोल ठरवत आघाडीने तगडे उमेदवार दिले. अनेक मातब्बरांचा या आघाडीमुळे धक्कादायक पराभव झाला. विशेष म्हणजे आघाडीतील अभ्यासू सतत सक्रिय असणारे नेते यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पक्षीय बलाबल
- एकूण प्रभाग - १६
- एकूण सदस्य - ६५
- भाजप - ४३
- शिंदेसेना - ३
- राष्ट्रवादी (अजित पवार) - १
- उद्धवसेना - १
- शिव-शाहू आघाडी (कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, माकप) - १७
Web Summary : BJP won the Ichalkaranji municipal election with 43 seats. The Shiv-Shahu alliance secured 17. BJP's development promises resonated with voters, leading to their victory. Mahayuti leaders led aggressive campaigns. The alliance presented formidable candidates, resulting in unexpected defeats for some.
Web Summary : इचलकरंजी नगर पालिका चुनाव में भाजपा ने 43 सीटें जीतीं। शिव-शाहू गठबंधन को 17 सीटें मिलीं। भाजपा के विकास के वादों ने मतदाताओं को प्रभावित किया, जिससे उनकी जीत हुई। महायुति के नेताओं ने आक्रामक अभियान का नेतृत्व किया। गठबंधन ने मजबूत उम्मीदवार पेश किए, जिसके परिणामस्वरूप कुछ अप्रत्याशित हार हुई।