शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी -८३.३३ कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: August 18, 2014 23:34 IST

पॉवरलूम मेगा क्लस्टर : जिल्हाधिकारी, वस्त्रोद्योग आयुक्ताकडून प्रकल्पाची पाहणी

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगात आधुनिकता आणण्याबरोबरच निर्यातीत उच्च दर्जाचे कापड उत्पादन, त्याचे विपणन, आदींसाठी लागणाऱ्या पायाभूत सेवा-सुविधा पुरविणाऱ्या पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पाच्या उभारणीची पाहणी जिल्हाधिकारी राजाराम माने, वस्त्रोद्योग आयुक्त एस. बालाराजू, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आदींनी केली. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपये खर्चाची गुंतवणूक होणार असून, यंत्रमाग क्षेत्रातील सायझिंग, विणकाम, प्रोसेसिंग व विपणन या चारही घटकांना त्यांनी भेटी दिल्या.केंद्र सरकारने इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पास तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली असून, तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पॉवरलूम मेगा क्लस्टरसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली होती. योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी येथील डीकेटीईला क्लस्टर व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार संस्था म्हणून नियुक्त केले आहे. डीकेटीईने या प्रकल्पाचा सविस्तर विकास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपये खर्चाची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचे ६० टक्के व सहभागी होणाऱ्या घटक संस्थांची ४० टक्के रक्कम असणार आहे.इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये व त्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांच्या बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपयांचे प्रस्ताव राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी माने, वस्त्रोद्योग आयुक्त बालाराजू, प्रकाश आवाडे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. ए. आय. वासीफ, प्रोसेसिंग असोसिएशनचे गिरीराज मोहता, पीडीएक्सएलचे संचालक सुनील पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी, आॅटोलूम असोसिएशनचे गोरखनाथ सावंत, इंजिनिअरिंग असोसिएशनचे सुहास अकिवाटे, कापड मार्केटचे महेश त्रिपाठी, आदींच्या पथकाने डीकेटीई, यशवंत प्रोसेसर्स, स्टेशन रोडवरील लक्ष्मी प्रोसेसर्सची जागा, आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि पाहणी केली. (प्रतिनिधी)