लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 03:35 PM2021-02-03T15:35:55+5:302021-02-03T15:47:56+5:30

GokulMilk Kolhapur-  गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

I will come to see you soon, Ravindra Apte's emotional video in the general meeting | लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

googlenewsNext
ठळक मुद्देलवकर तुमच्या भेटीला येईन : रवींद्र आपटे आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  

तब्येत बिघडल्याने गेले तीन महिने गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे घराबाहेर पडले नव्हते. सर्वसाधारण सभेतही ते येवू शकले नाहीत. मात्र त्यांचा एक व्हीडीओ आज झालेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेत दाखवण्यात आला. मात्र त्यांची तब्येत पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

Web Title: I will come to see you soon, Ravindra Apte's emotional video in the general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.