Kolhapur- चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर शस्त्राने वार, इचलकरंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:15 IST2023-09-11T14:14:34+5:302023-09-11T14:15:22+5:30
हाता-पायावर वार बसल्याने महिला गंभीर जखमी

Kolhapur- चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर शस्त्राने वार, इचलकरंजीतील घटना
इचलकरंजी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार केला. हाता-पायावर वार बसल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सचिन शिवाजी मोरबाळे (वय ३८, रा. कृष्णानगर) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पत्नी गौरी सचिन मोरबाळे (२५, रा. नमाजगे माळ) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गौरी व सचिन हे दोघे पती-पत्नी भगतसिंग बागेजवळून चालत निघाले होते. सचिनने तिच्या चारित्र्यावर संशय घेत हातात असलेल्या पिशवीतून कोयता काढून गौरीवर हल्ला केला. त्यामध्ये दोन्ही पायावर कोयत्याच्या समोरील टोचाने वार बसले. तसेच इतर वार अडवताना त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर वार बसला. त्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करीत पुन्हा मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.