पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:02 IST2025-08-06T12:01:29+5:302025-08-06T12:02:52+5:30
स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली

पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना
कळंबा : हात उसने घेतलेल्या व्याजाचे पैसे काय केले यावरून झालेल्या वादातून पती परशुराम पांडुरंग पाटील याने पत्नी अस्मिता हीचा गळा चिरून खून केला. कळंबा येथील सुर्वे नगरातील महालक्ष्मी कॉलनी येथे मंगळवारी (दि.५) मध्यरात्री ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, महालक्ष्मी कॉलनी येथे पांडुरंग पाटील गेली बारा वर्षे भाड्याच्या घरात दोन मुले, वडील यांच्यासोबत राहत होते. मूळचे सावर्डे पाटण तालुका राधानगरी येथील पांडुरंग उद्यम नगरात फोंड्री व्यवसायात आहेत. पत्नीने हात उसने घेतलेल्या व्याजाच्या पैशाचे नेमके काय झाले यावरुन दोघांत वाद झाला.
रात्री जेवण करून दोघे झोपण्यासाठी गेले असता पुन्हा वाद झाला. पती पांडुरंगला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला. अन् स्वतः करवीर पोलिस ठाण्यात फोन करून खुनाची कबुली दिली.
वाचा: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु
तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून रोहन वाकरेकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे तपास करीत आहेत.
दोन्ही मुले हताश
वडील फौंडीमध्ये कामास दोन्ही मुले कमवती एकंदरीत सुखी कुटुंब असणाऱ्या या घरात अचानक वडिलांनी उचललेल्या विघातक पावलाने आईचा हाकनाक बळी गेल्याने दोन्ही मुले हताश झाली होती.