शाहू ब्लड बँकेकडून मानवतेचे कार्य : राजेंद्र टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:04 IST2021-07-16T15:01:27+5:302021-07-16T19:04:42+5:30
Blood Bank Rajesh TOpe Kolhapur : राजर्षी शाहू ब्लड बँकेकडून गेली ४५ वर्षे मानवतेच्या कार्याचा महायज्ञ सुरू आहे असे गौरोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या स्थलांतर कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शाहू छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डावीकडून राजेद्र देशिंगे, ब्लड बँकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. (छाया- आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : गेली ४५ वर्षे रक्तदानाच्या माध्यमातून राजर्षी शाहू ब्लड बँकेने मानवतेचा महायज्ञ सुरू ठेवला आहे, असे गौरवोद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे काढले.
येथील शाहू ब्लड बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतर समारंभात ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, या रक्तपेढीने काळानुरूप बदल केले. रुग्णांच्या गरजा ओळखल्या. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. व्यावसायिक पध्दतीचा अवलंब न करता सेवाभावी वृत्तीने त्यांनी हे काम केले हे या रक्तपेढीचे वेगळेपण आहे. संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रक्तपिशवीचा आकार, खासगी रक्तपेढ्यांच्या किमतींवर नियंत्रण यासह अन्य ज्या काही सूचना केल्या आहेत. त्याचा निश्चितच विचार केला जाईल. संबंधित यंत्रणांशी बोलून याबाबत निर्णय घेतले जातील.
रोटरी समाजसेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे यांनी आभार मानले. अमित माटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजक व्ही. एन. देशपांडे, नितीन वाडीकर, प्रताप पुराणिक, राजीव परीख, राजू दोशी, साधना घाटगे, महेेंद्र परमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
यावेळी अधिकवेळा रक्तदान करणारे, इमारत उभारणारे आणि कंपन्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेणारे राजू लिन्सवाला, वसंतराव चव्हाण, रवीद्र जाधव, मिथुन सात्रा, अभिजित बुधले, अभिजित कानेटकर, चिन्मय कागलकर, शैलेश देशपांडे, पाटीदार समाज, घाटगे पाटील उद्योग, मेनन पिस्टन, वसंतराव चौगुले पतसंस्था, इंद्रजित नागेशकर, हर्षद तांदळे, मनीष मिश्रा, अतुल इंगवले, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.