Kolhapur News: सिध्दनेर्लीत दुधगंगा नदीपात्रात सापडल्या मानवी कवट्या, परिसरात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 11:55 IST2023-07-01T11:54:08+5:302023-07-01T11:55:13+5:30
शिवाजी पाटील सिध्दनेर्ली: येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटी आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच ...

Kolhapur News: सिध्दनेर्लीत दुधगंगा नदीपात्रात सापडल्या मानवी कवट्या, परिसरात उडाली खळबळ
शिवाजी पाटील
सिध्दनेर्ली: येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटी आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कागल पोलिस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी, जनावरे धुणेसाठी येत असतात. आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने कवटी दिसून आली. याबाबत त्यांनी पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी कागल पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या.
सदर चार मानवी कवटी एकाच परिसरात सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्यक्ती कोण? नेमका हा प्रकार कधी घडला? उर्वरित देह कुठे टाकला? यांची उत्तरे तपासाअंतीच समोर येणार आहेत. त्याचप्रमाणे या भागात अघोरी विदया करणारे काही भोंदु असल्याने त्यांनी अघोरी प्रकारासाठी या कवट्या वापरलेल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.