शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी घेणार? बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने वनविभागाचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:54 IST

यावेळी वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे निलंबन करावे तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर रात्री १२:३० वाजता ठोस आश्वासन मिळाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

शिराळा - बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर येथे बहीण भाऊ खेळत असताना अचानक बिबट्याचे हल्ला केल्याने या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) याचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार दिनांक ३० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.या घटनेनंतर हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. यावेळी वनविभागाचे कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाहीत व घटनास्थळी न आल्याने  संतप्त जमावाने वनविभागाचे कार्यालय फोडले.यावेळी एक कर्मचारी पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला.यावेळी घटनास्थळ व उपजिल्हा रुग्णालय परिसरात  मिळालेली माहिती अशी, राजवीर व त्याची मोठी बहीण कार्तिकी (वय ४वर्षे ) आपल्या घरातून शेजारी घरात  खेळत जात होते.यावेळी अचानक बिबट्या ओढ्याच्या बाजूने शेतातून येऊन राजवीरवर हल्ला केला.यावेळी बिबट्याने गळ्याला पकडले व तोंडांत धरून ओढत सुमारे पाचशे फुटावर शंकर केरु पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले.यावेळी  सोबत असणारी बहीण कार्तिकी ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने फरफटत नेले नागरिकांच्या आरडाओरडा मुळे तसेच राजवीरचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यांनी बॅटरी धरून उजेड पडला हा उजेड बिबट्या च्या तोंडावर पडल्याने राजवीर ला तेथेच टाकून पळून गेला. ओढ्यालगत गेले असता त्यांनी बॅटरीच्या झोतात पाहिले असता राजवीर जख्मी अवस्थेत आढळून आला.जखमी राजविरला पंडित शंकर पाटील, बजरंग पांडुरंग पाटील, शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, महादेव भीमराव पाटील, पोपट पाटील, राजू शंकर पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील यांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.उपजिल्हा रुग्णालयात माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, मनिषा नाईक , विराज नाईक,रणधीर नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक,सत्यजीत नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक,सुखदेव पाटील,रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्वी देशमुख, तहसीलदार शामला खोत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, नायब तहसीलदार विठ्ठल पाटील आदींनी भेट दिली.वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद? -यावेळी वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे निलंबन करावे तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर रात्री १२:३० वाजता ठोस आश्वासन मिळाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले.आणखी किती बळी घेणार? - जुलै २०२५ मध्ये गिरजवडे-मुळीकवाडी येथे एका ४ वर्षीय बालकावर बिबट्याने  हल्ल्या करून जखमी केले होते.बिऊर पासून तीन किलोमीटर अंतरावरील तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याच जवळील उपवळे  येथे ७ जानेवारी रोजी बिबट्याने ९ वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ११ वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले आहेत

६:४५ दत्तात्रय सर्जेराव पाटील  याने या परिसरात हा बिबट्या पहिला त्यावेळी त्यांनी काहींना याबाबत मोबाईल वरून सांगितले आणि अवघ्या पंधरा मिनिटात ही घटना घडली.या घटनेनंतरही अर्ध्यातासाने हा तोंडाला रक्त लागलेला बिबट्या याच परिसरात आला होता.आता हा बिबट्या चौथ्यांदा सव्वा नऊच्या दरम्यान याच परिसरात आला यामुळे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली रात्री साडे अकरा वाजता पुन्हा याठिकाणी मयत राजवीर याचे वडील हणमंत पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attack kills child; angry mob vandalizes forest office.

Web Summary : A six-year-old boy died in a leopard attack in Biur, Shirala. Enraged locals vandalized the forest department office after officials were unreachable. This is the latest in a series of leopard attacks in the area, raising concerns about safety.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याDeathमृत्यूforest departmentवनविभाग