शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहास घरफाळा वाढ नाकारण्याचा अधिकार

By admin | Updated: July 11, 2015 00:07 IST

कोल्हापूर महानगरपालिका : ४० टक्के वाढीचा प्रस्ताव, १ एप्रिल २०१६ पासून प्रस्तावित वाढ

कोल्हापूर : शहरातील जमीन व मिळकती रेडीरेकनरशी संलग्नित करून घरफाळ्यात वाढ न करण्याचा निर्णय २०११ मध्ये महापालिकेच्या सभागृहाने घेतला. त्यामुळे दरवर्षीच्या रेडीरेकनर वाढीमुळे १ एप्रिल २०१६ पासून घरफाळ्यात ४० टक्के वाढ अपेक्षित आहे. तत्पूर्वी, फेबु्रवारी २०१६ मध्ये होणाऱ्या महासभेपुढे हा प्रस्ताव आल्यानंतर नगरसेवकांना बहुमताने ही दरवाढ नाकारण्याचा अधिकार आहे. त्यावेळी ही वाढ ‘जैसे थे’ ठेवणे किंवा इतर पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो.महानगरपालिकेने पूर्वी करपात्र मूल्यांवर घरफाळा आकारण्याची पद्धत बंद करून सन २०११-२०१२ पासून भांडवली मूल्यांवर घरफाळा आकारणी सुरू केली. याचा परिणाम म्हणून शहरातील मिळकतींच्या घरफाळ्यात मोठी वाढ झाली. भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारणीसाठी रेडीरेकनर दराचा आधार घेतला जातो; परंतु तसा निर्णय घेताना एकदा घरफाळा ठरला की त्यात पुढची पाच वर्षे कोणताही बदल करता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले. सध्या रेडीरेकनरचे दर वाढले असले तरी महापालिकेने भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळ्यात पुढील पाच वर्षे कोणताही बदल करायचा नाही, असा निर्णय त्यावेळी महासभेने घेतला. रेडीरेकनरच्या दराशी घरफाळा जोडला गेल्यानंतर दरवर्षी यामध्ये होणाऱ्या किमान १० ते १५ टक्के दरवाढीचा फटका घरफाळा वाढीच्या रूपाने बसणार होता. यानंतर मोकळ्या जागा व मिळकतींच्या किमतीनुसार शहरातील मिळकतींच्या घरफाळ्यातही वाढ झाली असती. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर मिळकतधारकांचा घरफाळा या मधल्या काळात वाढला नाही. याची एकत्रित अंमलबजावणी प्रत्यक्षात १ एप्रिल २०१६ च्या घरफाळा बिलात केली जाणार, हे त्यावेळी निश्चित झाले. मात्र, महासभेला ही दरवाढ नाकारण्याचा किंवा दुसरा पर्याय स्वीकारण्यासह पुढील पाच वर्षांसाठी ठोक घरफाळा वाढविण्याचा अधिकार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.रेडीरेकनरच्या दरानुसार घरफाळा करात वाढ न केल्यानेच १ एप्रिल २०१६ नंतर ही वाढ होणार आहे. मात्र, तत्पूर्वी होणाऱ्या महासभेला हा प्रस्ताव नाकारण्याचा किंवा त्यावेळी दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याचा अधिकार आहे. - संजय भोसले, इस्टेट आॅफिसर, महापालिका.