शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कष्टातून उभारलेले घर आगीत खाक

By admin | Updated: August 2, 2015 01:24 IST

सिद्धार्थनगरमधील हृदयद्रावक घटना : कांबळे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या कांबळे कुटुंबीयांनी अठरा विश्व दारिद्र्यात जगत असताना काबाडकष्ट करून दोन मजली घर बांधले. सुखी जीवनाचा संसार सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक घराला शॉर्टसर्किटने आग लागली आणि त्यामध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यावेळी कुटुंबाचा होणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. सिद्धार्थनगर येथील सत्याई गल्लीमध्ये अविनाश शंकर कांबळे यांचे दोन मजली घर आहे. ते व त्यांची पत्नी दोघेही खासगी नोकरी करतात. आई-वडील व मुलगा असे त्यांचे कुटुंब याठिकाणी वास्तव्यास आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने कांबळे दाम्पत्याने कष्टातून दोन मजली घर बांधले होते. शनिवारी सकाळी ते व पत्नी कामावर गेले. आई व मुलगा बाहेर गेले होते. वडील वरच्या मजल्यावर झोपले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून मोठा आवाज होऊन धुराचे लोट बाहेर आले. हा आवाज ऐकून शेजारील लोकांनी आरडाओरड केली. यावेळी अजय कांबळे या मुलाने वरच्या मजल्यावर झोपलेल्या आजोबांना खाली आणले. त्यानंतर काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी आतमधले काहीच दिसत नव्हते. या घटनेची माहिती अग्निशामक दलास देण्यात आली. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तीन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रथम ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना बोलावून विद्युतप्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर पाण्याच्या फवाऱ्याने आग विझविण्यात आली. आगीमध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले होते. कांबळे यांच्या घरामध्ये फ्रिज होता. तो सुरूच असल्याने शॉर्टसर्किट होऊन त्याचा स्फोट झाला. त्यानंतर आगीने पेट घेतल्याची शक्यता अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तविली.नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळालेले प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्यात आले होते. मोठा अनर्थ टळला स्वयंपाक घरामध्ये पूर्ण भरलेली गॅस सिलिंडर टाकी होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वप्रथम स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करून सिलिंडरची टाकी बाहेर काढली. यासाठी थोडा जरी उशीर झाला असता, तर टाकीचा स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला असता. तसे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी सांगितले. या आगीमध्ये शेजारी राहणाऱ्या कमल मुकुंद कोल्हे यांच्याही घराला झळ पोहोचून त्यामध्ये त्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.