कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:59 IST2026-02-07T16:59:08+5:302026-02-07T16:59:46+5:30

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी

Horrific accident in Kolhapur, four people were killed by a speeding car in Shahumil area | कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार

कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार

कोल्हापूर: शाहूमिल चौक ते उद्यमनगर रोडवर भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या अपघातात कार उलटलली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कारने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार उडून पडल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. या अपघातात आणखी काहीजण जखमी असण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत कार रस्त्यावरुन बाजूला करता वाहतूक सुरळीत केली. मात्र, अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

Web Title : कोल्हापुर में भीषण दुर्घटना: तेज रफ्तार कार ने चार को टक्कर मारी

Web Summary : कोल्हापुर के शाहूमिल चौक के पास एक तेज रफ्तार कार ने चार लोगों को टक्कर मार दी, जिससे कार पलट गई। पुलिस मौके पर पहुंची और बड़ी संख्या में लोग जमा हो गए। रिपोर्ट अपडेट होने पर आगे की जानकारी दी जाएगी।

Web Title : Horrific Accident in Kolhapur: Speeding Car Hits Four

Web Summary : A speeding car struck four people near Shahumil Chowk in Kolhapur, causing the car to overturn. Police responded to the scene as a large crowd gathered. Further details are awaited as the report is updated.