यशवंत खाडे पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:01+5:302021-09-22T04:27:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगरुळ : सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव ...

Honored with Yashwant Khade Award | यशवंत खाडे पुरस्काराने सन्मानित

यशवंत खाडे पुरस्काराने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगरुळ : सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आंतरराज्य ‘सामाजिक सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चिकोडी येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, बेळगाव पाेलीस अधीक्षक महेश मेघनावार, मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यशवंत खाडे हे गेली अनेक वर्षे सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून, कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस या संस्थेतही ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आकाराम पाटील, सरदार खाडे, संदीप खाडे उपस्थित होते.

फोटो ओळी : सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांना चिकोडी येथे ‘सामाजिक सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (फोटो-२१०९२०२१-कोल-सांगरुळ)

Web Title: Honored with Yashwant Khade Award