शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच हनिट्रॅपचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:32 IST

पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

ठळक मुद्देसगळा व्यवहार फेसबूकवर लैंगिक चॅटिंगमधून सावज जाळ्यात

कोल्हापूर : पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावधानतेने बचावलेल्या काहींनी यासंदर्भातील अनुभव शेअर केले व त्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. गेल्याच आठवड्यात साताऱ्यात एका प्रसिद्ध डॉक्टरला अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून त्यांच्याकडे ६० लाखांची खंडणी मागण्याची घटना घडली आहे.या महिला आपले सावज मुख्यत: फेसबुकवर शोधत असतात. एखाद्या व्यक्तीने पोस्ट शेअर केली की त्यावर लगेच प्रतिसाद देऊन त्या माध्यमातून ओळख करून घेतली जाते. प्रत्यक्ष फोनवरून बोलणे किंवा भेटीच्या माध्यमातून या महिला कधीच समोर येत नाहीत. जे काही असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क वाढविला जातो.

एकदा अंदाज आल्यानंतर मॅसेंजरवरून व्यक्तिगत चॅटिंग करत तुमची सगळी माहिती काढून घेतली जाते. हे चॅटिंगही अशा स्वरूपाचे असते की कोणतेही व्यक्ती त्याच्या मोहाला बळी पडते. सामान्यत: आपण पत्नी अथवा मैत्रिणीसोबतही ज्या प्रकारचे विषय कधीच फारसे बोलत नाही असे विषय बोलले जातात. व्यक्तीला या प्रकरणाच्या संभाषणाची भूक असते. असे काही दिवस झाल्यानंतर मग शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला पाहायची इच्छा आहे, असे सांगून कपडे उतरवण्यासाठी आग्रह धरला जातो.

व्हिडिओ कॉल करून तशा अवस्थेत मला तुम्हाला पाहायचे आहे, असे सांगितले जाते. एकदा असे केले की तुम्ही जाळ्यात अडकलाच म्हणून समजा. त्याच आधारे मग तुमच्याकडे पैशांची मागणी व ब्लॅकमेलिंग सुरू होते. संबंधित व्यक्ती वयाने जास्त असते. कोणत्या तरी संस्थेत पदावर काम करत असते. त्यामुळे अब्रूच्या भीतीने पैसे देऊन विषय मिटवून टाकण्याकडे कल असतो.

एकटी महिला अथवा पती-पत्नीकडून संगनमतानेही अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग केले जात आहे. कोल्हापुरातही काही दिवसांपूर्वी निगडी, पुणे परिसरातील महिलांकडून सतत फेसबुकवर वावर असणाऱ्या व्यक्तींना असे फोन आले आहेत. त्यांनी त्यातील धोका ओळखून वेळीच सावध झाल्यामुळे ते त्यांच्या ट्रॅपला बळी पडले नाहीत. सातारच्या घटनेनंतर त्यांना हे नेमके काय प्रकरण आहे याचा उलगडा आता झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर