चौकात सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:19+5:302021-07-03T04:17:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शांतीनगर चौकामध्ये रोख रक्कम पडल्याचे ताहीर सलीम बागवान यांना मिळून आले. त्यांनी हे पैसे ...

Honestly return the amount found in the square | चौकात सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे परत

चौकात सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे परत

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शांतीनगर चौकामध्ये रोख रक्कम पडल्याचे ताहीर सलीम बागवान यांना मिळून आले. त्यांनी हे पैसे गावभाग पोलीस ठाण्यात दिले. पोलिसांनी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून संबंधित व्यक्तीस ती रक्कम परत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, सोहेल अब्दुल नदाफ (रा. विक्रमनगर) हे फॅब्रिकेशनचे काम करतात. ते एका ठिकाणी काम करून त्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम घेऊन इचलकरंजी ते रिंगरोड या मार्गावरून मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या खिशातून पैसे पडल्याचे घरी गेल्यानंतर समजले. दरम्यान, ताहीर यांना ती रक्कम मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी ताहीर यांचे कौतुक करून संबंधित व्यक्तीची खात्री करून त्यांना त्या पाकिटामधील असलेले रोख रक्कम आठ हजार ४०० रुपये परत दिले.

Web Title: Honestly return the amount found in the square