शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण रद्दच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: March 7, 2015 01:04 IST

मुस्लिम आरक्षण प्रश्न : कॉँग्रेसतर्फे निदर्शने : आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा

कोल्हापूर : आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा...हमारा हम लेके रहेंगे...फडणवीस सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कॉँग्रेसने शुक्रवारी तीव्र निदर्शने केली. निर्णयमागे न घेतल्यास येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजप सरकारने मुस्लिम समाजाला मिळालेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश काढला आहे. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. कालच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर यासंदर्भात आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुपारी अडीच वाजता जिल्हा कॉँग्रेस व कॉँग्रेस जिल्हा अल्पसंख्याक विभागातर्फे दसरा चौकातील छत्रपती शाहू पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आरक्षण रद्द केलेल्या सरकारी अध्यादेशाची होळी केली. तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला. ‘आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा, हमारा हम लेके रहेंगे, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारप्रती आपला निषेध प्रकट केला. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, आर्थिक मागासलेल्या व असंघटीत असलेल्या मुस्लिम समाजासाठी कॉँग्रेसने हे आरक्षण दिले होते. राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पक्षाने हा निर्णय घेतला होता.परंतु भाजपा सरकारने आरक्षण रद्द करुन समाजावर अन्याय केला आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल. यावेळी कॉँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष तौफिक मुल्लाणी यांचेही भाषण झाले. आंदोलनात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, संपतराव चव्हाण-पाटील, महंमद शरीफ शेख, एस. के. माळी, शंभूराजे देसाई, रुपाली पाटील, राजू अत्तार, नौशाद मोमीन, जाफर मलबारी, अरीफ शेख आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)