शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: करवीर तालुक्यात हाय होल्टेज लढती, इच्छुकांकडून जोरदार तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:23 IST

महायुतीकडे उमेदवारांची मांदियाळी काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार

प्रकाश पाटीलकोपार्डे : करवीर तालुक्यातील १२ जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील तब्बल ७ मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहेत. सर्वसाधारण महिला ३ तर नागरिकांचा मागस प्रवर्गसाठी २ मतदारसंघात आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे इतर तालुक्यांपेक्षा करवीर तालुक्यात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. महायुतीकडे उमेदवारांची मांदियाळी आहे. मात्र काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार आहेत.करवीर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक १२ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव, निगवे खालसा, वडणगे, सडोली खालसा, पाडळी खुर्द असे तब्बल ७ मतदारसंघ सर्वसाधारण आहे. नव्याने उदयास आलेल्या पाडळी खुर्द मतदारसंघात भाजपचे डॉक्टर के. एन. पाटील, शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यात काटे की टक्कर होणार आहे.वडणगे मतदारसंघातून इंद्रजित पाटील, रवींद्र पाटील,सचिन चौगले यांनी तयारी सुरू केली आहे. निगवे खालसामधून सुमित चौगुले, सागर पाटील, प्रताप पाटील, रणजीत पाटील, एकनाथ पाटील, किरण पाटील, अजित चव्हाण, अभिषेक बोंद्रे अशी इच्छुकांची मोठी रांग आहे. गोकुळ शिरगाव मतदारसंघातून के. डी. पाटील, शशिकांत खोत, उदय पाटील अशी नावे चर्चेत आहेत.शिंगणापूर, सांगरूळ, कळंबे तर्फे ठाणे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. शिंगणापूर मध्ये माजी शिक्षण सभापती रसिका पाटील, प्रियांका राजेंद्र दिवसे, डॉ. वर्षा इंद्रजित पाटील, रचना अविनाश पाटील, ज्योत्स्ना पाटील यांची जोरदार तयारी सुरू आहे. सांगरूळमध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्षा विमल पाटील, त्यांच्या सूनबाई धनश्री पाटील, रेखा प्रकाश मुगडे, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्या पत्नी राजश्री खाडे, इंदूताई ज्ञानदेव नाळे, भाग्यश्री प्रशांत नाळे यांनी तयारी सुरू केली आहे. येथे काँग्रेसला उमेदवार शोधावा लागणार आहे. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात मनीषा अरुण टोपकर व वनिता सागर भोगम ही नावे चर्चेत आहेत.शिये, मुडशिंगी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. शिये मतदारसंघातून कृष्णात पवार, चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील, विश्वनाथ पवार, प्रदीप पाटील अशी इच्छुकांची नावे आहेत आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक यांच्याबरोबर काँग्रेसमधून राहुल पाटील महायुतीत आल्याने ताकद वाढली आहे. आमदार सतेज पाटील यांना करवीरमध्ये काँग्रेसची ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. महायुतीत इच्छुकांची गर्दी आहे. यामुळे उमेदवार निवडताना नेत्यांची दमछाक होणार आहे.एकूण जिल्हा परिषद मतदारसंघ - १२

English
हिंदी सारांश
Web Title : High-stakes Kolhapur Zilla Parishad elections in Karveer; aspirants gear up.

Web Summary : Karveer taluka sees heightened competition for Zilla Parishad elections with open category seats. Mahayuti faces candidate abundance, while Congress seeks contenders. Key battles emerge in Padali Khurd, Wadange, and Nigve Khalsa constituencies. Women's seats also witness intense preparation, especially in Shingnapur and Sangrul.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५PoliticsराजकारणMahayutiमहायुतीcongressकाँग्रेस