शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांना तत्काळ मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने असंघटित आणि वंचित घर कामगारांना तत्काळ साडेसात हजार रूपयांची मदत करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट ...

कोल्हापूर : राज्य शासनाने असंघटित आणि वंचित घर कामगारांना तत्काळ साडेसात हजार रूपयांची मदत करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा समितीच्या ऑनलाईन बैठकीत शुक्रवारी करण्यात आली.

शासनाने तत्काळ बेडस, व्हेंटिलेटर, औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होईल यासाठी प्रशासन सक्रिय करून अंमलबजावणी करावी. कामगारांच्या काही विभागांना जाहीर केलेल्या मदतीत वाढ करावी. असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग,सायझिंग, इंजिनिअरिंग, आदी विभागांना अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. ऊसतोड कामगारांना मदत करावी. मोफत धान्य वितरण व्यवस्थेमध्ये केशरी कार्ड धारकांचा समावेश करावा. या बैठकीत डॉ. सुभाष जाधव यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य उदय नारकर, जिल्हा सचिव प्राचार्य ए. बी. पाटील, सचिव सदस्य भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, विकास पाटील, दत्ता माने, शंकर काटाळे, मुमताज हैदर, राजेश वरक, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, आण्णासो रड्डे, नारायण गायकवाड उपस्थित होते. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण कक्ष आणि जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन पाठविण्यात आले.

चौकट

मदत करावी

तालुका आणि स्थानिक पातळीवर समित्या करून कोरोनामुळे अडचणीत असणाऱ्यांना मदत करावी. लोकांचे प्रबोधन करावे.औषधे, बेडस, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, अशी सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.