शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

By admin | Updated: July 28, 2014 00:33 IST

‘तो’ फलक पुन्हा हटवला : मराठी भाषिक, महिला, विद्यार्थ्यांना घरांत घुसून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून हैदोस घातला. पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी लक्ष्य केले.विराट गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, शिवाजीनगर आणि शिवाजी रोड या भागांत पोलिसांनी खाकी वर्र्दीतील गुंड असल्याप्रमाणे वर्तन केले. गावातील मराठी भाषिकांच्या घरांचे बंद दरवाजे तोडून पुरुष, महिला, तरुणांना त्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: झोडपून काढले. घरांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनांचीही मोडतोड केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते; पण त्यांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. आपल्या घरात दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन बसलेल्या /पान ४ वरकेंद्र शासनाकडे दाद मागणार : मुख्यमंत्रीमराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत़ कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही़, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते़ ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो़ आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.तीन हजार पोलीस.... पहाटेची कारवाईरविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस गाड्यांचे ताफे, तीन हजारांहून अधिक पोलीस अशा फौजफाट्यासह जिल्हाधिकारी एन. जयराम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. चंद्र गुप्त यांच्या नेतृत्वात गावाच्या सर्व सीमा बंद केल्या. पोलीस बंदोबस्तात हा फलक पुन्हा उद्ध्वस्त केला. गावात रांगोळी घालणाऱ्या महिलांना घराबाहेर पडू दिले नाही. ज्यांनी ही घटना पाहिली, जाब विचारला, त्या महिलांना अक्षरश: बेदम मारहाण केली.मराठी भाषिकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध व्यक्त करत निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने उद्या, सोमवारी ‘निपाणी बंद’ची हाक दिली आहे; तर सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत १४४ कलम व जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे . / वृत्त ४