कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; विक्रेते अन् ग्राहकांची उडाली तारांबळ-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:29 IST2025-10-21T16:25:36+5:302025-10-21T16:29:10+5:30
कोल्हापूर : शहरात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकच पावसाच्या जोरदार सरी कोसळून लागल्याने नागरिकांची ...

कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; विक्रेते अन् ग्राहकांची उडाली तारांबळ-video
कोल्हापूर: शहरात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकच पावसाच्या जोरदार सरी कोसळून लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दिवाळी सणामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्याची माल सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने अन् कडकडीत ऊन असल्याने नागरिक छत्री, रेनकोट विना बाहेर पडले होते. आज, लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. अशातच आज दुपारी भर उन्हातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही मिनिटातच रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. पावसाने उघडीप घेताच पुन्हा रस्त्यावर वर्दळ सुरु झाली.