शित्तूर-वारुण परिसरात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST2021-05-16T04:23:55+5:302021-05-16T04:23:55+5:30

शित्तूर-वारुण (दि. १५) शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने पुन्हा ...

Heavy rains in Shittur-Varun area | शित्तूर-वारुण परिसरात वादळी पाऊस

शित्तूर-वारुण परिसरात वादळी पाऊस

शित्तूर-वारुण (दि. १५)

शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. पावसामुळे परिसरात काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Heavy rains in Shittur-Varun area