शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
4
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
5
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
6
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
7
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
8
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
9
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
10
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
11
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
12
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
13
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
14
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
15
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
16
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
17
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
18
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
19
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
20
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली

कोल्हापुरात दमदार; धरणक्षेत्रात धुवाधार, नद्यांच्या पातळीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:34 IST

दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने वाढली

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून दमदार पाऊस कोसळला. दिवसभर काहीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी ४७ टक्के, तर तुळशी धरण ५२ टक्के भरले आहे. घरांच्या पडझडीसह इतर दोन लाखांचे नुकसान झाले असून, शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने वाढली.हवामान विभागाने सोमवारी सायंकाळी सहानंतर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे लोक सोमवार सायंकाळपासूनच घाबरून होते. अनेकांनी दिवसभर घरातच थांबण्याची तयारी केली होती. मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. दिवसभर चांगली उघडीप राहिली.नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून, काही नद्यांचे पाणी हळूहळू पात्राबाहेर पडू लागले आहे. सलग पाच दिवस पाऊस सुरू असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री पंचगंगेची पातळी १९.९ फुटांवर होती. १२ बंधारे पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

कागलमध्ये सर्वाधिक पडझडकागल तालुक्यात मुगळी, सिद्धनेर्ली, सोनगे, कापशी या गावांत घरांच्या भिंती कोसळून व केळीसह मका पीक वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातही एका घराची भिंत कोसळली आहे. यामध्ये दोन लाख एक हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.तुळशी धरणक्षेत्रात ५१७ मिलिमीटर पाऊसमे महिन्यात जिल्ह्यातील धरणे तळ गाठतात; पण ११ मेपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पाऊस तुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक ५१७ मिलिमीटर झाला आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ३०० मिलिमीटर पाऊस झाला.

धरणसाठा जास्त कशामुळेकोल्हापूर जिल्ह्यात अनेक वेळा जूनअखेरपर्यंत मान्सून ओढ देतो. त्या काळात पिकांसाठी, पिण्यासाठी पाणी लागते. त्यामुळे पाटबंधारे विभाग धरणात पुरेसा पाणीसाठा ठेवताे. यंदा अचानकच मान्सूनपूर्व जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणे निम्म्यावर आली आहेत.

गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये व साठा टीएमसी -

धरण पाऊस (मिलिमीटर)साठा (टीएमसी)
राधानगरी २४ ४.००
तुळशी ६४ १.८३
वारणा १३.७५
दूधगंगा ३६४.८४
कासारी ४८०.८१
कडवी २२ १.०६
कुंभी४३१.२५
पाटगाव  ७५१.५१
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीWaterपाणी