शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी; ‘पंचगंगे’ची पातळी ७ फुटांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:28 IST

बारा बंधारे पाण्याखाली, ‘राधानगरी’चा विसर्ग कायम

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले असून गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात सात फुटांनी वाढली असून, तब्बल १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता ‘पंचगंगे’ची पातळी १३ फुटांवर होती. सायंकाळी पाच वाजता २० फुटांवर पोहोचली. दरम्यान, आज मंगळवारीही कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

घटप्रभा धरण क्षेत्रात २२५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात सर्वच धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाला आहे. घटप्रभा धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २२५ मिलिमीटर, तर कुंभी व पाटगावमध्ये २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘राधानगरी’ धरण क्षेत्रात १७२, कासारी परिसरात १४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील १९ सर्कलमध्ये ढगफुटीचंदगड, आजरा, कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा तालुक्यातील १९ सर्कलमध्ये चोवीस तासांत ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये

  • हातकणंगले : ३०
  • शिरोळ - १९
  • पन्हाळा - ५४
  • शाहूवाडी - ५२
  • राधानगरी - ६५
  • गगनबावडा - १३५
  • करवीर - ४१
  • कागल - ६५
  • गडहिंग्लज - ४१
  • भुदरगड - ६५
  • आजरा - ६०
  • चंदगड- ७४