शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:32 IST

ऑरेंज अलर्टचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत वाढ होवून ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी काही काळ उसंत घेतली, पण अकरापासून पुन्हा जोर पकडला. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरातही पाऊस असल्याने सगळीकडे पाणी झाले आहे. आठवडा सुट्टी, त्यात पाऊस असल्याने शहरातील अनेक रस्ते ओस पडल्यासारखे दिसत होते.रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत झाला आहे. धरणक्षेत्रातही पाऊस अधिक असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे सुरुवातीला दोन आणि नंतर दोन, असे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ७२१२ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी आज, सोमवारी २८.०३ फूट होती. ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चार धरणक्षेत्रांत धुवाधार..घटप्रभा, पाटगाव, कोदे, कासारी या चार धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस कोसळला आहे. सरासरी ११० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस येथे झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.पडझडीत ३.९० लाखांचे नुकसानजिल्ह्यात २० खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.ऑरेंज अलर्टचा इशाराकोल्हापूरसह सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यासाठी आज, सोमवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दिवसभरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDamधरण