शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 12:24 IST

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. दिवसभर एकसारखा पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीचपाणी झाले आहे. शहरात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३२.०९ फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ५७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.जिल्ह्यात काल, रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत ११ वाजेपासून एकसारखा पाऊस सुरू होता. दिवसभर संततधार कोसळत असून, कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.राधानगरी धरण ४२ टक्के भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १३०० तर वारणा धरणातून ६७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले असून, आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे. विविध नद्यांवरील ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून, दोन राज्य मार्ग व चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. पंचगंगेची ३९ फूट पातळी ही इशारा पातळी म्हणून ओळखली जाते.काल, रविवारी दिवसभरात १५ बंधारे पाण्याखालीरविवारी सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पातळी २८ फुटांपर्यंत होती, दिवसभरात दोन फुटांची वाढ होत असतानाच तब्बल १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोदे धरण भरले...जिल्ह्यात आतापर्यंत चंदगड तालुक्यातील घटप्रभा, जांबरे धरणे भरली आहेत. रविवारी सकाळी गगनबावडा तालुक्यातील कोदे हा लघू पाटबंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यातून प्रतिसेकंद ४०० घनफुटाचा विसर्ग सुरू आहे.१२ मालमत्तांची पडझडजिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६ लाख २८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्गजिल्ह्यातील राधानगरी धरणात ३.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.५७ बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडूकली व सांगशी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे 

राधानगरी ३.८७ टीएमसी, तुळशी १.७१ टीएमसी, वारणा १६.६६ टीएमसी, दूधगंगा ८.३३ टीएमसी, कासारी १.२५ टीएमसी, कडवी १.६७ टीएमसी, कुंभी १.१४ टीएमसी, पाटगाव २.३२ टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री १.०१ टीएमसी, जंगमहट्टी ०.९३ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, आंबेआहोळ १.०० टीएमसी, सर्फनाला ०.२५ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. 

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम ३२.२ फूट, सुर्वे ३०.६ फूट, रुई ६० फूट, इचलकरंजी ५६ फूट, तेरवाड ४८ फूट, शिरोळ ३९ फूट, नृसिंहवाडी ३७ फूट, राजापूर २६.६ फूट तर नजीकच्या सांगली  ११.६ फूट व अंकली १५.४ फूट अशी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणीDamधरण