शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:15 IST

सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात बुधवारी दिवसभर उघडझाप असली तरी धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २४.३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत तब्बल सव्वादोन फुटांनी वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील २४ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.बुधवारी कोल्हापूर शहरात पावसाने काहीसी उसंत घेतल्याचे दिसले. पण, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात जास्त पाऊस आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून, इतर धरणातून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे.काल, बुधवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीची पातळी २१.८ फुटापर्यंत होती, दिवसभरात म्हणजे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती २४.२ फुटापर्यंत पोहोचली होती. सोळा बंधारे पाण्याखाली गेले असून, आज, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.पंधरा ‘सर्कल’मध्ये अतिवृष्टीजिल्ह्यातील पंधरा सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे, कसबा वाळवे, गगनबावडा, साळवण, हेर्ले, चंदगड, बाजारभोगाव या सर्कलमध्ये धुवाधार पाऊस कोसळला आहे.पडझडीत ३.६२ लाखांचे नुकसानबुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ३ खासगी मालमत्तांची अंशता पडझड झाली. यामध्ये ३ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी व हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव असे २४ बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे 

राधानगरी २.९७ टीएमसी, तुळशी १.४७ टीएमसी, वारणा १३.२६ टीएमसी, दूधगंगा ५.८६ टीएमसी, कासारी १.०१ टीएमसी, कडवी १.३७ टीएमसी, कुंभी ०.९६ टीएमसी, पाटगाव १.८२ टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री ०.७१ टीएमसी, जंगमहट्टी ०.६१ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.७६ टीएमसी, आंबेआहोळ ०.९१ टीएमसी, सर्फनाला ०.१२ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी 

राजाराम २६.४ फूट, सुर्वे २५.४ फूट, रुई ५५ फूट, इचलकरंजी ५२ फूट, तेरवाड ४५.९ फूट, शिरोळ ३६ फूट, नृसिंहवाडी ३३ फूट, राजापूर २२.९ फूट तर नजीकच्या सांगली  १०.९ फूट व अंकली १४.२ फूट अशी आहे.

सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक ६४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- १ मिमी, शिरोळ -०.५ मिमी, पन्हाळा- १३ मिमी, शाहुवाडी- १९.६ मिमी, राधानगरी- ४०.६ मिमी, गगनबावडा- ६३.८ मिमी, करवीर- ३.६ मिमी, कागल- ६.३ मिमी, गडहिंग्लज- १७.८ मिमी, भुदरगड- ५५ मिमी, आजरा- ६४.८ मिमी, चंदगड- ५८.९ मिमी, असा एकूण २२.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसWaterपाणीDamधरणriverनदी